नाना पाटेकरांवर कारवाई नको, कानशिलात लगावलेल्या फॅननं दाखवलं मोठं मन!

नानांनी मारलेली थप्पड ही शूटिंगला भाग नसल्याचं चाहत्याने सांगितलं आहे. तसेच नानांवर कारवाई करणार नसल्याचंही तो म्हणाला.

    अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांच थप्पडकांड सद्या चर्चेत आहे. वाराणसीत जर्नी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या फॅनला कानाखाली मारली होती. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर नाना पाटेकर यांनी व्हिडिओ जारी करत यावर माफी मागितली होती. आता या प्रकरणी अपडेट समोर आलं असून ज्याच्या कानाखाली लगावण्यात आली त्या फॅनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. नानांनी मारलेली थप्पड ही शूटिंगला भाग नसल्याचं चाहत्याने सांगितलं आहे. तसेच नानांवर कारवाई करणार नसल्याचंही तो म्हणाला.

    काय म्हणाला फॅन

    नानांनी ज्याला थप्पड लगावली तो फॅन माध्यमांसोबत बोलताना म्हणाला की,”बनारसमधील तुलसीपुरात मी लहानाचा मोठा झालो आहे. नाना पाटेकरांचा मी मोठा चाहता असून त्यांनी आता माझ्या कानाखाली वाजवली आहे. मी गंगा घाटावर गेलो होतो तेव्हा तिथे सुरू असलेलं शूटिंग पाहायला मी गेलो. त्यावेळी मी नाना पाटेकरांना पाहिलं आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांच्याजवळ गेलो. दरम्यान त्यांनी सेल्फी न देता माझ्या कानाखाली वाजवली”. मला त्यांच्या सिनेमात कोणतीही भूमिका मिळालेली नाही. नानांनी माझ्या कानाखाली वाजवल्यानंतर सेटवर माझा अनादर करण्यात आला. कानाखाली वाजवल्यानंतर मला पळवून लावण्यात आलं. नानांच्या या वागण्याने मी खूप निराश झालो आहे. पण मला या प्रकरणाची कोणतीही कारवाई करायची नाही”.

    नानांनी मागितली माफी

    नाना पाटेकर यांनी कानाखाली वाजवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर  त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत म्हण्टलं की,  झालेल्या प्रकाराबद्दल मी माफी मागत आहे. ”मला वाटलं की तो आमचाच क्रू मेंबर आहे. पण नंतर मला जेव्हा कळलं की तो चाहता आहे. तेव्हा त्याला मी आवाज दिला. थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो लगेच निघून गेला होता. त्यामुळे मला त्याला भेटता आलं नाही”.