सेल्फीसाठी चाहता पुढे येताच नाना पाटेकरने वाजवली कानाखाली; व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल

अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या वाराणसीत जर्नी चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. या दरम्यान नानाची सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या फॅनला नानाने थप्पड मारल्याने नव्या चर्चेला सुरूवात झाली.

    वाराणसी : अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या वाराणसीत जर्नी चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. या दरम्यान नानाची सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या फॅनला नानाने थप्पड मारल्याने नव्या चर्चेला सुरूवात झाली. एवढेच नाही तर त्याच्यासोबत उभ्या असलेल्या क्रू मेंबरने त्या तरुणाची मान पकडून त्याला तेथून ढकलून दिले. ही संपूर्ण घटना कोणीतरी त्याच्या फोनवर रेकॉर्ड केली आहे.

    आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते नाना पाटेकरांच्या या वागण्याचा निषेध करत आहेत. चाहत्यांसोबतचे त्याचे असे वागणे कुणालाही सहन झालेले नाही.

    गदर-2 फेम दिग्दर्शक अनिल शर्मा त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करण्यात गुंतले आहेत. या चित्रपटाचे नाव आहे ‘जर्नी’ या चित्रपटात नाना पाटेकर यांच्यासोबत अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्माही काम करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग वाराणसीपासून सुरू आहे. या चित्रपटातील एका भक्तिगीताचे चित्रीकरण येथे होत आहे.

    यावेळी दशाश्वमेध चौकात काही दृश्यांचे शुटिंग सुरू होते. यावेळी अभिनेता नाना पाटेकर यांच्यासह चित्रपटाचा संपूर्ण क्रू उपस्थित होता. नाना पाटेकर यांना पाहताच त्यांचे चाहतेही तेथे पोहोचले होते आणि त्यांना त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचा प्रयत्न केला.