अभिनेते नसीरुद्दीन शाह रूग्णालयात दाखल!

नसीरुद्दीन शाह यांच्या मॅनेजरने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून नसीरुद्दीन शाह रुग्णालयात दाखल आहेत.

    बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नसीरुद्दीन यांना निमोनिया झाला आहे आणि त्यांच बरोबर फुफ्फुसात पॅचदेखील सापडला आहे. नसीरुद्दीन शाह यांची तब्येत ठीक नसल्याचे वृत्त यापूर्वी देखील समोर आले होते. मात्र ती अफवा होती. मात्र यावेळचे वृत्त खरे असून त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रत्ना पाठक आणि मुले आहेत.

    नसीरुद्दीन शाह यांच्या मॅनेजरने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून नसीरुद्दीन शाह रुग्णालयात दाखल आहेत. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना न्युमोनिया झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या फुफ्फुसात पॅच दिसला आहे त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर उपचाराचा परिणाम होतो आहे.