सेल्फीसाठी मागे मागे येणाऱ्या फॅनवर ओरडले नसीरुद्दीन शाह, व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडुन ट्रोल!

नुकतचं अभिनेता नसीरुद्दीन शाह दिल्ली विमानतळावर स्पॅाट झाले. एक फॅन त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा ते त्याच्यावर मोठ्याने ओरडले.

  नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत. देशात आणि जगात त्यांचे करोडो चाहते आहेत. अलीकडेच तो दिल्ली विमानतळावर स्पॅाट झाले. त्यांना पाहतात त्यांचे फॅन्स त्यांची सेल्फी घेण्यासाठी त्यांच्या मागेमागे यायला लागले. मात्र, हे पाहून नसीरुद्दीन शाह त्या फनवर ओरडले. त्यांचा हा व्हिडिओ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर इंटरनेच यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सेलिब्रेटींना त्यांची प्रायव्हसी द्यायला हवी असे काहींचं म्हणणं आहे, तर काहीजण त्यांना गर्व न बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

  नसीरुद्दीन शाह फॅनवर ओरडले

  व्हिडिओमध्ये दिसतय की नसीरुद्दीन शाह यांनी मास्क लावला आहे. ते विमानतळावरुन बाहेरच्या दिशेने निघाले . त्यांना पागताच त्यांचे फॅन त्यांच्या मागे मागे आले. यावेळी एका चाहत्याने जेव्हा सेल्फी मागितला तेव्हा ते त्याच्यावर ओरडले, ‘तुम्ही लोकं सोडतच नाही, असं त्यांनी म्हण्टलं’. यानंतर ते पुढे जाताक आणि त्यांच्या गाडीत बसतात.

  सोशल मीडियावर ट्रोल

  हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली की, ‘प्रथम तुम्हाला प्रसिद्ध व्हावं लागेल, फक्त वृत्ती दाखवण्यासाठी… ठीक आहे तुमचं स्वतःचं आयुष्य आहे पण तुम्ही तुमच्या बोलण्यात नम्र असलं पाहिजे.’ एकजण म्हणाला, ‘एवढा अभिमान कशाला?’ एकाने लिहिलं की, ‘एवढा आदर कोण देतो, हे समजत नाही. फक्त आपला वेळ विनाकारण वाया घालवतो.

  आगामी वेब सिरीज

  नसीरुद्दीन शाह शेवटचा ‘कुत्ते’ चित्रपटात दिसले होते. यामध्ये तब्बू, अर्जुन कपूर, राधिका मदन, कोंकणा सेन शर्मा आणि कुमुद मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला. आता ते ‘शोटाइम’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही वेबसिरिज डिस्नी प्लस हॉटस्टारवर ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. नसीरुद्दीन शाहसह  इमरान हाश्मी, महिमा मकवाना, मौनी रॉय, राजीव खंडेलवाल, श्रिया सरन आणि विशाल वशिष्ठ यांच्याही यात महत्त्वाच्या भुमिका आहेत.