गुरु, हो जाओ शुरू! नवज्योत सिंग सिद्धू कपिल शर्मा शोमध्ये करणार कमबॅक?, अर्चना सिंगचा मोठा खुलासा…

नवज्योत सिंग सिद्धू यांच्यानंतर अर्चना पूरण सिंग या द कपिल शर्मा शोचं परमनंन्ट गेस्ट म्हणून भूमिका साकारत आहेत. परंतु आता पंजाबमध्ये राजकीय भूकंप आल्यानंतर सिद्धू पुन्हा एकदा शोमध्ये वापसी करणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  नवी दिल्ली: द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show)मधून भारताचे माजी क्रिकेटर आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) हे शोमधून पायउतार झाले होते. त्यानंतर कपिल शर्मा आणि त्यांच्या टीमने नवज्योत सिंग सिद्धू यांच्या खुर्चीवर एक टायगर पपेटला बसवून काम सुरू केलं होतं. परंतु एके दिवशी अचानक शोमध्ये अर्चना पूरण सिंगची (Archana Puran Singh) एन्ट्री झाली. परंतु नवज्योत सिंग सिद्धू पायउतार झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला होता. मात्र, आता सिद्धू पुन्हा एकदा शोमध्ये वापसी करणार असल्याची चर्चा रंगत आहे.

  सिद्धू पुन्हा एकदा शोमध्ये वापसी करणार?

  नवज्योत सिंग सिद्धू यांच्यानंतर अर्चना पूरण सिंग या द कपिल शर्मा शोचं परमनंन्ट गेस्ट म्हणून भूमिका साकारत आहेत. परंतु आता पंजाबमध्ये राजकीय भूकंप आल्यानंतर सिद्धू पुन्हा एकदा शोमध्ये वापसी करणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिद्धूंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते शोमध्ये कमबॅक करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

   अर्चना पूरण सिंगचा मोठा खुलासा…

  सिद्धू पुन्हा एकदा शोमध्ये कमबॅक करत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या कमबॅकची चर्चा तुफान पसरली आहे. चाहत्यांमध्ये नवीन उत्सुकता दिसून येत आहे. परंतु इंन्स्टंट बॉलिवडने पोस्ट केलेल्या माहितीनुसार, अर्चना पूरण यांनी सांगितलं की, मी कपिल शर्मा शो सोडण्यास तयार आहे. जर सिद्धू खरोखरचं माझ्या जागेवर येण्यास इच्छूक असतील तर, मला कामं करण्यासाठी अजून बऱ्याच गोष्टी आहेत. या पोस्टनंतर कपिल शर्मा शोमध्ये Navjot Singh Sidhu की Archana Puran Singh प्रमुख पाहुणे म्हणून कमबॅक करणार, हे पाहणं सर्व चाहत्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)