
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazudin Siddiqui) पत्नीवर IPC कलम 452, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाजुद्दीनची पत्नी जैनबवर आरोप आहे की ती ज्या बंगल्यात गेली होती तिथे तिचं सासूबरोबर भांडण झालं. नवाजुद्दीन त्याची आई आणि पत्नी यांच्यामध्ये संपत्तीवरून वाद झाला आहे.
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui)आईने आपल्या सुनेविरोधात पोलिसांकडे तक्रार (Fir) केली आहे. त्यावरून नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायकोवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांच्या तक्रारीवरून नवाजुद्दीनची दुसरी बायको जैनब उर्फ आलियाविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. वर्सोवा पोलिसांनी जैनबला चौकशीसाठी बोलावलं आहे.
Actor Nawazuddin Siddiqui’s mother Mehrunisa Siddiqui filed an FIR against the actor’s wife Zainab. Versova police has called her for questioning. It is alleged that Zainab had an argument with Nawazuddin’s mother: Versova Police
— ANI (@ANI) January 23, 2023
संपत्तीवरून वाद
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीवर IPC कलम 452, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाजुद्दीनची पत्नी जैनबवर आरोप आहे की ती ज्या बंगल्यात गेली होती तिथे तिचं सासूबरोबर भांडण झालं. नवाजुद्दीन त्याची आई आणि पत्नी यांच्यामध्ये संपत्तीवरून वाद झाला आहे.
नवाजुद्दीन आणि जैनब यांचं लग्न 2010 मध्ये झालं. दोघांना दोन मुलं आहेत. मात्र फार कमी लोकांना माहिती आहे की जैनब ही नवाजुद्दीनची दुसरी पत्नी आहे. मात्र 2020 साली नवाजुद्दीन आणि त्याच्या बायकोमध्ये वाद झाले आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुलांसाठी ते पुन्हा एकत्र आले. एका मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला होता की, मला सकारात्मक राहण्याची गरज आहे. जैनब माझ्या मुलांची आई आहे त्यामुळे मी कायमच तिच्या सोबत आहे.
आलियाच्या आधी नवाजने नैनीताल जवळील हल्दवानी येथे राहणाऱ्या शीबा नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं. आईच्या सांगण्यानुसार नवाजने शीबाशी लग्न केलं होते. मात्र हे लग्न सहा महिनेही टिकलं नाही. लवकरच दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नवाज आलियासोबत लग्नबंधनात अडकला.
नवाजने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मला माझ्या आईनेच लग्न टिकवण्याचा सल्ला दिला होता. आई म्हणाली होती,लग्न टिकवण्याची संधी आली तर सोडू नकोस. त्यामुळे मी आणि आलियाने पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता.
नवाजुद्दीनच्या पर्सनल लाईफमध्ये भलेही अनेक अडचणी येत असतील मात्र प्रोफेशनल लाईफमध्ये तो बॉलीवूडच्या अग्रणी कलाकारांपैकी एक आहे. नवाजुद्दीन ज्या चित्रपटात काम करतो त्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची लोकांच्या मनावर एक वेगळी छाप पडते. नवाजुद्दीन लवकरच ‘हड्डी’या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तो एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे.