nawazuddin

नवाजुद्दीनची (Nawazuddin siddiqui) पत्नी आणि आईत संपत्तीवरुन वाद असल्याची माहिती आहे. यावरुन त्यांच्यात भांडणही झाल्याचं सांगण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा यांनी अलियाच्या विरोधात घरात जबरदस्तीने शिरल्याप्रकरणी तक्रार दाखल केलेली आहे.

    मुंबई: प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याची पत्नी अलिया सिद्दीकीनं (Aliya Siddiqui) पुन्हा एकदा आपल्या वैवाहिक आयुष्यात न्यायाची मागणी सार्वजनिकरित्या केली आहे. पती नवाजुद्दीन आणि सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचारांतर्गत आरोप करणाऱ्या अलियानं आता व्हिडीओतून तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांना तोंड फोडलं आहे. सोशल मीडियावर तिनं हा व्हिडिओ (Aliya Siddiqui Video) टाकला आहे. त्यात 7 बेडरुम असलेल्या घरात तिला हॉलमध्ये राहण्यासाठी कसं भाग पाडलं जातंय, हे तिनं दाखवलंय. इतकंच नाही तर दुबईतून तिच्यासोबत आलेल्या त्यांच्या मुलांनाही हॉलमध्येच सोफ्यावर झोपावं लागतंय

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Aaliya Siddiqui (@aaliyanawazuddin)

    अलियाचा सोशल मीडियावर व्हिडीओ
    अलिया सिद्दीकीनं फेसबुकवर आपला एक व्हिडिओ टाकून तिची परिस्थिती जगासमोर आणली आहे. अलियानं इन्स्टावर याचा व्हिडीओ शेअर करत लिहिलंय की, गेल्या 7 दिवसांपासून माझ्याच पतीच्या घरात मला हॉलमध्ये झोपावं लागतंय. यासाठी मला भाग पाडण्यात येतं आहे. माझी मुलं, जी दुबईहून आली आहेत, तेही हॉलमध्ये सोफे एकमेकांना जोडून झोपतायेत. पाहुण्यांसाठी असलेल्या छोट्या बाथरुमचा वापर करुन आम्ही दिवस घालवतो आहोत. ना या घरात जेवण मिळतंय ना झोप. या सगळ्यासोबतच माझ्या चारही बाजूंना सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत. माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरेही लावण्यात आलेत.

    सासरच्यांनी सगळं लॉक केलेलं आहे
    अलियाने याच पोस्टमध्ये पुढं लिहिलं आहे की, इथं ना शांतता आहे ना प्रायव्हसी. सगळे सातही बेडरुम सासरच्यांनी बंद करुन ठेवले आहेत. माझा पती नवाजुद्दीन याच्याशी माझा काही संपर्कही होऊ शकत नाहीये. माझ्या या परिस्थितीवर तो भूमिकाही घेत नाहीये. इतकंच काय पण माझ्या वकिलांनाही माझ्याकडून कायदेशीर कागदपत्रांवर सह्या घेण्यास मज्जाव करण्यात आलाय. माझ्यावर सुरु असलेला सासूरवास कधी संपेल का, न्यायाच्या प्रतीक्षेत.

    अलिया नजरकैदेत
    अलिया सिद्दीकीची ही पोस्ट व्हायरल होते आहे. ही पोस्ट पाहून अनेक जणांना धक्का बसतोय. काही जण अलियाला मदत करण्याची इच्छाही व्यक्त करतायेत. यातच अलियाच्या वकिलांनीही त्यांची बाजू मांडली आहे. अलिया आणि तिच्या अल्पवयीन मुलांना निगराणीत ठेवण्यात आलं असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

    नवाजुद्दीनची आई आणि पत्नीत मालमत्तेवरुन वाद
    नवाजुद्दीनची पत्नी आणि आईत संपत्तीवरुन वाद असल्याची माहिती आहे. यावरुन त्यांच्यात भांडणही झाल्याचं सांगण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा यांनी अलियाच्या विरोधात घरात जबरदस्तीने शिरल्याप्रकरणी तक्रार दाखल केलेली आहे. पोलिसांनीही या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय. नवाजुद्दीनच्या पत्नीचं खरं नाव अंजना किशोर पांडे आहे, तिनं लग्नानंतर ते नाव अलिया जैनब असं केलेलं आहे.