nay varanbhat loncha poster

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचे दिग्दर्शन असलेला ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा!’ (Nay Varanbhat Loncha Kon Nay Koncha) हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

  निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचे दिग्दर्शन असलेला ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा!’ (Nay Varanbhat Loncha Kon Nay Koncha) हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे (Bold Scene) राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. या चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य काढण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर युट्यूबसह  (Trailer Removed From Youtube And Social Media) सर्व सोशल मीडियावर बदलांसह पुन्हा टाकण्यात येणार आहे. हा सिनेमा १४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

  महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा!’ या चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारीला प्रदर्शित करण्यात आला. दोन मित्रांवर आधारित असलेल्या या क्राइम थ्रिलर चित्रपटात अनेक बोल्ड दृश्य आहेत. चित्रपटात अल्पवयीन मुलं असल्याने अनेक पालकांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा पाहायला मिळत होती. या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यानंतर दोन दिवसात त्यावरुन वाद पाहायला मिळत होते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)


  वादानंतर त्यावर राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. यानतंर आयोगानं देखील ती दृश्य चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसेच, हा ट्रेलर तातडीने यूट्यूबवरून काढण्याची देखील मागणी केली आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने दिग्दर्शक महेश मांजरेकरांना लेखी खुलासाही मागवला होता.

  या संपूर्ण प्रकरणानंतर चित्रपटाचे निर्माते श्रेयांश हिरावत म्हणाले, “सोशल मीडियावर व इतर प्लॅटफॉर्मवर शेअर होत असलेला हा ट्रेलर आम्ही सेन्सॉर केला होता. युट्यूबवर १८ वर्षावरील प्रेक्षकांना तो पाहता येईल, याची काळजी आम्ही घेतली होती. युट्यूबवर जरी वयाची मर्यादा असली तरी इतर प्लॅटफॉर्मवर आमचे नियंत्रण नाही. अनेकांनी तो ट्रेलर डाऊनलोड करुन शेअर केला आहे. या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणे आमच्यासाठी शक्य नव्हते.”

  “दरम्यान आम्ही महिला आयोगाने उपस्थित केलेल्या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आहे. आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. ” असे ते म्हणाले.