नयनतारा आणि विघ्नेश शिवनच्या वेडिंग डॉक्यूमेंट्रीचा टीझर झाला रिलीज!

साऊथची लेडी सुपरस्टार म्हणून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री नयनतारा आणि दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांच्या लग्नाच्या माहितीपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

    साऊथची लेडी सुपरस्टार म्हणून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री नयनतारा आणि दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांच्या लग्नाच्या माहितीपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल’ असे या माहितीपटाचे नाव आहे.

    तिचा पती विघ्नेश शिवन सांगतो की, एक स्त्री म्हणून तिचा स्वभाव आणि चारित्र्य खूप प्रेरणादायी आहे. ती आतून खूप सुंदर आहे. हा टीझर व्हिडिओ OTT प्लॅटफॉर्म Netflix India South ने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा माहितीपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.

    विशेष म्हणजे नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांचा विवाह ९ जून रोजी महाबलीपुरममध्ये झाला. या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि खास मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. या लग्नात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. रजनीकांत, शाहरुख खान, विजय सेतुपती, सुरिया आणि एआर रहमान यांनीही लग्नाला हजेरी लावली होती.