नयनतारासाठी प्रभूदेवाने बायकोसोबत घेतला घटस्फोट, आता तीने थाटला दुसऱ्याच अभिनेत्याबरोबर संसार!

तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये हातात साखरपुड्याची अंगठी घातली असल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करत तिने तामिळ भाषेत 'मी माझे आयुष्य तुझ्या हातात देते' असे कॅप्शन दिले आहे.

  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नयनतारा. गेल्या काही दिवसांपासून नयनतारा चर्चेत आहे. त्याच कारण म्हणजे नयनतारा विग्नेश शिवनला डेट करत आहे. दोघेही एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. त्यांच्या फोटंना चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळतो. मात्र नयनताराच्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by nayanthara🔵 (@nayantharaaa)

   

  तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये हातात साखरपुड्याची अंगठी घातली असल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करत तिने तामिळ भाषेत ‘मी माझे आयुष्य तुझ्या हातात देते’ असे कॅप्शन दिले आहे. नानुम राऊडी या चित्रपटाच्या सेटवर नयनतारा आणि विग्नेश यांची भेट झाली होती. २०१५ पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. पण दोघांनीही कधी उघडपणे यावर वक्तव्य केले नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by nayanthara🔵 (@nayantharaaa)

   

  प्रभूदेवाचा संसार मोडला

  एकेकाळी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये नयनतारा आणि कोरिओग्राफर, दिग्दर्शक प्रभूदेवा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी प्रभूदेवा विवाहित होता. इतकच नव्हे तर नयनतारामुळे प्रभू देवाचा संसार मोडला असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान ते दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by nayanthara🔵 (@nayantharaaa)