kranti redkar and sameer wankhede

एका वेबसाइटने क्रांतीवर (Kranti Redkar Gets Angry On Fake News Of Website)आयपीएल मॅच फिक्सिंगचे आरोप असल्याचे शीर्षक दिल्याचे बघितल्यावर क्रांती रेडकरने संताप व्यक्त केला आहे.

    क्रूझ ड्रग्स प्रकरणात(Cruise Drugs Case) एनसीबीनं छापा टाकून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काही आरोपींना अटक केली. गेल्या काही दिवसांपासून आर्यन जेलमध्ये आहे. या प्रकरणाचा तपास मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) करत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर चर्चेत आहेत. अशातच एका वेबसाइटने क्रांतीवर (Kranti Redkar Gets Angry On Fake News Of Website)आयपीएल मॅच फिक्सिंगचे आरोप असल्याचे शीर्षक दिल्याचे बघितल्यावर क्रांती रेडकरने संताप व्यक्त केला आहे.

    क्रांतीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्ही हे काय करत आहात? काही मोजक्या व्ह्यूजसाठी तुम्ही दिशाभूल करणारे शीर्षक दिले आहे. कशासाठी? मी या प्रकरणी कोर्टात केस लढवली आणि ती जिंकलीसुद्धा. मी पूर्ण वृत्त वाचले, त्यात चुकीच्या ओळखीच्या प्रकरणाबाबत लिहिले आहे. पण मग शीर्षक असं का दिले? फक्त पैशांसाठी की माझी आणि समीरची प्रतिमा मलिन करण्यासाठी?’


    पुढे ती म्हणते, ‘प्रत्येकजण संपूर्ण बातमी वाचत नाही. तुमच्या निष्काळजी आणि असंवेदनशील लिखाणामुळे आम्ही ट्रोल होतोय. आम्हीही माणूस आहोत, आम्हालाही भावना आहेत. तुमच्या चुकीच्या रसभरीत वर्णनासाठी आम्ही नाही. जर मी दोषी असते, तर मी माझी चूक मान्य केली असती. पण मी दोषी नाही त्यामुळे मी हे सहन करणार नाही.’

    एका वृत्तवाहिनीनेन आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात क्रांती रेडकरच्या नावाचा उल्लेख केला. या प्रकरणी क्रांतीने त्या वृत्तवाहिनीविरोधात मानहानीचा खटला लढवला होता. या खटल्याचा निकाल क्रांतीच्या बाजूने लागला होता. मात्र आता पुन्हा एकदा याबाबत एका वृत्तावाहिनीने वृत्त दिल्यामुळे क्रांती रेडकर संतापली आहे.