आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर एनसीबी आता सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत,आर्यनच्या विरोधात पुरावे नसल्याचे मुंबई हायकोर्टाने केले स्पष्ट

मुंबई हायकोर्टाने(Mumbai High Court) आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धनेला या तिघांना जामीन मंजूर(Bail To Aryan Khan) केला. त्यानंतर शनिवारी मुंबई हायकोर्टाकडून या प्रकरणातील सविस्तर बेल ऑर्डर जारी करण्यात आली आहे. यात आर्यन खानविरोधात एनसीबीकडे(NCB) कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

    मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात(Cruise Drugs Party Case) शाहरुखचा मुलगा आर्यन खानला(Aryan Khan Bail) मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या विरोधात आता सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी एनसीबीने (NCB To Appeal In Supreme Court)सुरु केली आहे. या प्रकरणातील हायकोर्टाच्या सविस्तर निर्णयाची वाट पाहत असून, जामीनाचे आदेश मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरु असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. २ ऑक्टोबरला क्रूझवरील छापेमारीवेळी आर्यन आणि त्याच्या साथीदारांना एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर २८ ऑक्टोबरला मुंबई हायकोर्टाने आर्यन आणि त्याच्या साथीदारांना जामीन मंजूर केला आहे.

    मुंबई हायकोर्टाने आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धनेला या तिघांना जामीन मंजूर केला. त्यानंतर शनिवारी मुंबई हायकोर्टाकडून या प्रकरणातील सविस्तर बेल ऑर्डर जारी करण्यात आली आहे. यात आर्यन खानविरोधात एनसीबीकडे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. आर्यन आणि इतर कथित आरोपींनी एकत्र ड्रग्ज घेण्याबाबत कोणताही कट रचल्याचे पुरावे नसल्याचेही या सविस्तर ऑर्डरमध्ये नमूद करण्यात आले आहे. आर्यन खान याच्या व्हॉट्सअप चॅटलाही पुरावे म्हणून फारसे महत्त्व देण्यात आलेले नाही. फक्त एकत्र प्रवास केला आणि एकाचवेळी ते तिघेही क्रूझवर उपस्थित होते, याशिवाय कटाचा कोणताही आरोप या तिघांविरोधात सिद्ध करता आलेला नाही.

    आर्यन खानकडे कोणतेही ड्र्ग्ज सापडले नाही – रोहतगी
    आर्यन खान याला एनसीबीच्या कोठडीत का ठेवण्यात आले, याचे कोणतेही कारण दिले नसल्याचा दावा आर्ननचे वकील मुकुल रोहतगी यांनी केला होता. त्याच्याकडून कोणतेही ड्रग्ज मिळालेले नाहीत, त्यामुळे त्याला अटक करणे चूक असल्याचे रोहतगी यांनी सांगितले होते. आर्यन खान हा तरुण मुलगा आहे त्यामुळे त्याला जेलमध्ये पाठवण्यापेक्षा सुधारगृहात पाठवायला हवे, असा युक्तीवादही रोहतगी यांनी केला होता.

    मुंबई हायकोर्टाच्या सविस्तर जामीन आदेशानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीला लक्ष्य केले होते. या प्रकरणी समीर वानखेडे यांना निलंबित करण्याची मागणीही मलिक यांनी केली होती.