फाल्गुनी पाठकच्या ‘या’ लोकप्रिय गाण्याचं रिमीक्स वर्जन रिलीज, नेहा कक्करनं दिलाय आवाज

नेहा कक्करशिवाय या गाण्यात क्रिकेटर यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि बिग बॉस स्पर्धक प्रियांक शर्मा देखील आहेत.

    नव्या नव्या रोमॅन्टिक गाण्यांनी तरूणाईला आकर्षित करणारी गायिका नेहा कक्करने पुन्हा एक नवे गाणे प्रेक्षकांसाठी आणले आहे. नेहा नेहमी तिच्या गोड आवाजाने चाहत्यांना भुरळ घालते. तिच्या प्रत्तेक गाण्याला चाहते डोक्यावर घेतात. आता पुन्हा एकदा नेहाचं प्रेमगीत ‘ओ सजना’ हे नवं गाणे रिलीज झालं असून फॅन्स खूप पसंत करताना दिसत आहे. नेहा कक्करशिवाय या गाण्यात क्रिकेटर यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि बिग बॉस स्पर्धक प्रियांक शर्मा देखील आहेत.

    नेहा कक्करचे हे नवीन गाणे फाल्गुनी पाठकच्या ‘मैने पायल है छनकाई’ या गाण्याचा रिमेक आहे. गाण्याचे अनेक बोल बदलले असले तरीसुद्धा नेहाच्या मधुर आवाजाने ते आणखी छान झालेले आहे. ‘ओ सजना’ हे गाणं जानी यांनी लिहिलेलं असून तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केलंय.

    ‘ओ सजना’ या नवीन गाण्यात प्रियांक शर्मा नेहा कक्कर आणि धनश्री वर्मा यांच्यात अडकलेला दिसत आहे. गाण्यात प्रियांक धनश्री आणि नेहा कक्कर या दोघींच्या प्रेमात पडताना दिसत आहे. या तिघांनी गाण्यात अप्रतिम डान्स मूव्ह्सही केल्या आहेत.
    नेहा कक्करचे हे नवीन गाणे टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे. रिलीज होताच त्याला भरपूर लाईक्स मिळत आहेत. त्याच वेळी, वापरकर्ते कमेंट बॉक्समध्ये कौतुकाचे पूल बांधताना दिसत आहेत. त्याची प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले – त्याच्या आवाजात नक्कीच काहीतरी जादू आहे, म्हणूनच तो नक्कीच लाखो लोकांच्या हृदयात आहे. तर दुसर्‍याने लिहिले – काय गाणे आहे !! नेहू आणि धनश्रीचा उत्कृष्ट अभिनय. तुमचा इतका सुंदर आणि मधुर आवाज आहे. इतर वापरकर्ते देखील अशाच प्रकारे त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसतात.