nehul samiksha won in me honar superstar

‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’ (Me Honar Supersatar Jallosh Dancecha)कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. द लायन्स क्रु, विजय-चेतन, नेहुल–समीक्षा आणि मायनस थ्री या चार जणांमध्ये अंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत पुण्याच्या नेहुल वारुळे आणि समीक्षा घुलेनं(Nehul And Samiksha Won In Me Honar Superstar) बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली.

    स्टार प्रवाहवरील (Star Pravah)‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’ (Me Honar Supersatar Jallosh Dancecha)कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. द लायन्स क्रु, विजय-चेतन, नेहुल–समीक्षा आणि मायनस थ्री या चार जणांमध्ये अंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत पुण्याच्या नेहुल वारुळे आणि समीक्षा घुलेनं(Nehul And Samiksha Winners Of Me Honar Superstar) बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली, तर उपविजेते ठरले द लायन्स क्रु. विजय-चेतन ही जोडी ठरली तृतीय क्रमांकाची मानकरी. तर मायनस थ्री ग्रुपला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं.

    विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना नेहुल आणि समीक्षा दोघंही भावूक झाले होते. हा दिवस स्वप्नवत असल्याची भावना दोघांनीही व्यक्त केली. महाअंतिम सोहळ्यात समीक्षाच्या हाताला दुखापत झाली होती. मात्र तरीही खचून न जाता समीक्षा आणि नेहुलनं बेस्ट परफॉर्मन्स दिला. महाअंतिम सोहळ्यातला हाच परफॉर्मन्स त्यांना विजेतेपद देऊन गेला. चार वर्षांपूर्वी ओम डान्स क्लासमध्ये दोघांची ओळख झाली. जेव्हा मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाविषयी कळलं, तेव्हा दोघांनीही या कार्यक्रमात सामील होण्याचं ठरवलं. नृत्यात वेगवेगळे प्रयोग सादर करत दोघांनीही अंतिम सोहळ्यात धडक मारली. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे दोघंही आनंदात आहेत. नेहुलसाठी या स्पर्धेची मिळालेली रक्कम खूप महत्वाची असून, याचा वापर तो आईच्या खांद्यावरील कुटुंबाचा भार हलका करण्यासाठी वापरणार आहे.