neighbours

विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेल्या ‘नेबर्स’ (Neighbours) या चित्रपटात चेतन चिटणीस (Chetan Chitnis), कृतिका गायकवाड (Krutika Gaikwad), सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke), प्रसाद जवादे (Prasad Jawade), शैलेश दातार, नेहा बाम, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

    कल्पना रोलिंग पिक्चर्स प्रॉडक्शन निर्मित, मिठुवाला प्रॉडक्शन्स यांचे सादरीकरण असलेल्या ‘नेबर्स’ (Neighbours) या चित्रपटाची सध्या खूप चर्चा सुरु आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेल्या या चित्रपटात चेतन चिटणीस (Chetan Chitnis), कृतिका गायकवाड (Krutika Gaikwad), सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke), प्रसाद जवादे (Prasad Jawade), शैलेश दातार, नेहा बाम, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. निर्माते हितेश पटेल आणि दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या या चित्रपटात एक रहस्यमय प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या २३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

     

    दिग्दर्शक विनय घोलप यांचीच पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद हृषिकेश कोळी आणि विनय घोलप यांनी लिहिले आहेत तर छायालेखनाची महत्वाची जबाबदारी कॅमेरामन आशुतोष आपटे यांनी सांभाळली आहे.

    गीतकार मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार निषाद यांनी स्वरसाज चढविला आहे तसेच पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे. श्री गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांनी संकलन केले असून चित्रपटाची तांत्रिक बाजू विशाल तळकर (व्हीएफएक्स), भूषण दळवी (डीआय), आणि दिनेश उचिल व शंतनू अकेरकर (ध्वनी-रेखन), अनुप देव आदी तंत्रज्ञांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल भोसले असून कला दिग्दर्शन संजीव राणे यांनी केले आहे. शीतल पावसकर यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.