
नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंगबाबत (Netflix Password Sharing) कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
नेटफ्लिक्स (Netflix) वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर तुमचा पासवर्ड तुमच्या मित्रांसोबत शेअर करत असाल तर, आता त्याचा उपयोग होणार नाही. नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंगबाबत (Netflix Password Sharing) कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
पुढील वर्षापासून (New Year 2023) नेटफ्लिक्स (Netflix) आपल्या युजर्सना घराबाहेरील लोकांसोबत पासवर्ड शेअर करण्याची परवानगी देणार नाही.
पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 च्या सुरुवातीपासून नेटफ्लिक्स युजर्स त्यांच्या अकाउंटचा पासवर्ड मित्र किंवा त्यांच्या घराबाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला शेअर करु शकणार नाहीत. (Netflix to end password sharing in 2023) याशिवाय तुम्ही तुमचा नेटफ्लिक्स (Netflix) पासवर्ड तुमच्या घराबाहेरील कोणाशी शेअर केल्यास, त्या व्यक्तीला नेटफ्लिक्समध्ये प्रवेश करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. पैसे न भरता, कोणीही त्यांच्या मित्राच्या नेटफ्लिक्स प्रोफाइलमध्ये प्रवेश करू शकणार नाही.
नेटफ्लिक्स गेल्या काही महिन्यांपासून पासवर्ड शेअरिंग संपवण्याचे पर्याय शोधत (Netflix to end password sharing in 2023) आहे. आता नेटफ्लिक्सने याबाबत कठोर पावले उचलली आहेत. वॉशिंग्टन जर्नलच्या वृत्तानुसार, नेटफ्लिक्स पुढील वर्षी यूजर्सना पासवर्ड शेअर करण्यावर बंदी घालणार आहे. कंपनी हे नियम अचानक लागू करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने लागू करू शकते.
नेटफ्लिक्सने (Netflix) सबस्क्रिप्शन प्लॅन लॉन्च केल्यापासून पासवर्ड शेअरिंग ही मोठी समस्या बनली आहे. मात्र कंपनीने तोटा होईपर्यंत युजर्सवर कोणतीही कारवाई केली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सचा महसूल कमी झाला आणि प्लॅटफॉर्मने 10 वर्षांत पहिल्यांदा आपले सबस्क्रायबर गमावले. यामुळेच कंपनीला पासवर्ड शेअरिंग बंद करण्यावर विचार करावा लागला.