नवीन हरियाणवी गाणे ‘दामन’ रिलीज, सपना चौधरीने घागरा चोली घालून केला जबरदस्त डान्स!

प्रसिद्ध हरियाणवी नृत्यांगना सपना चौधरी तिच्या चाहत्यांसाठी नवीन गाणे घेऊन हजर झाली आहे. तिचे नवीन हरियाणवी गाणे 'दमन' रिलीज झाले आहे.

    प्रसिद्ध हरियाणवी नृत्यांगना सपना चौधरी तिच्या चाहत्यांसाठी नवीन गाणे घेऊन हजर झाली आहे. तिचे नवीन हरियाणवी गाणे ‘दमन’ रिलीज झाले आहे. या गाण्यात सपना चौधरी ग्लॅमरस लूकमध्ये घागरा चोली परिधान करताना दिसत आहे. सोनोटेक म्युझिक वर्ल्डच्या यूट्यूब चॅनलवर तिचे गाणे प्रसारित केले जात आहे. अक्की आर्यनने या गाण्याला आवाज दिला आहे. हे गाणे सपना चौधरी आणि ध्रुव सिंघल यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल राकेश माजरेयांनी लिहिले आहेत. आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक लोकांनी हे गाणे पाहिले आहे. त्याचबरोबर 31 हजार लोकांनी त्याला लाईक देखील केले आहे.