pravah picture

तुमचे आवडते चित्रपट पहायचे राहून गेले असतील तर काळजी नसावी. प्रवाह पिक्चर (Pravah Picture) आता हा आनंद थेट तुमच्या घरी घेऊन येणार आहे.

    नव्याकोऱ्या सिनेमांचा (Movie Channel) खास नजराणा सादर करत कुटुंबाला एकत्र आणण्याचे हे खास क्षण आपल्या आयुष्यात घेऊन येणार आहे डिस्ने स्टारची नवी चित्रपट वाहिनी ‘प्रवाह पिक्चर’ (Pravah Picture) . प्रवाह पिक्चर ही नवी वाहिनी नुकतीच सुरु करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी मराठी चित्रपटसृष्टीतले (Marathi) सर्व दिग्गज कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते.

    दर रविवारी नव्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चर ही वाहिनी करणार आहे. ‘प्रवाह पिक्चर’ या नव्या वाहिनीच्या माध्यमातून प्रवाह ब्रॅण्डचा विस्तार करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या वाहिनीच्या माध्यमातून मराठी सिनेमा साजरा करण्याची आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी मिळत आहे. या नव्योकोऱ्या वाहिनीच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षकांना आपल्या आवडत्या सिनेमांचा आनंद लुटता येईल. दर्जेदार मनोरंजनाच्या शोधात असलेल्या मराठी कुटुंबासाठी प्रवाह पिक्चर ही वाहिनी हक्कांचं दालन असेल याची आम्हाला खात्री आहे अशी भावना नेटवर्क एंटरटेनमेंट चॅनल्स आणि डिस्ने स्टारचे प्रमुख केविन वाझ यांनी व्यक्त केली.

    प्रवाह पिक्चरवर प्रीमियर्सचा हा खजिना ‘पावनखिंड’ या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमापासून सुरु होणार आहे. १९ जूनला हा धमाकेदार सिनेमा पहाता येईल. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. यासोबतच हेमंत ढोमे दिग्दर्शित मल्टीस्टारर ‘झिम्मा’ हा आणखी एक सुपरहिट चित्रपट प्रवाह पिक्चरवर पहाता येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ‘कधी आंबट कधी गोड’ आणि ‘प्रवास’ या दोन सिनेमांची देखील प्रवाह पिक्चरवर खास पर्वणी असेल. सुपरस्टार स्वप्नील जोशीचा ‘बळी’, महेश मांजरेकर यांचा ‘ध्यानीमनी’, मल्टीस्टारर आणि समीक्षकांनी प्रशंसित ‘कारखानीसांची वारी’ येत्या काही आठवड्यांत प्रवाह पिक्चर वाहिनीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

    तुमचे आवडते चित्रपट पहायचे राहून गेले असतील तर काळजी नसावी. प्रवाह पिक्चर आता हा आनंद थेट तुमच्या घरी घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे हे चित्रपट वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर म्हणून फक्त प्रवाह पिक्चरवर प्रक्षेपित केले जातील आणि हेच या वाहिनीचं  वेगळेपण आहे.