सुपरस्टार रजनीकांतच्या ‘जेलर’ चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज!

सुपरस्टारचे रजनीकांत चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर रजनीकांत आणि नेल्सन दिलीपकुमार ट्विटरवर ट्रेंड करत आहेत.

    मुंबई : साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.
    ‘जेलर’च्या या नवीन चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‘थलाविअर 169’ होते, आता ते बदलून जेलर ठेवण्यात आले आहे. याचं नवं पोस्टर नुकतंच समोर आलयं.

    या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले आहे. सुपरस्टारचे रजनीकांत चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर रजनीकांत आणि नेल्सन दिलीपकुमार ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. टायटल पोस्टर पाहता हा चित्रपट अॅक्शन एंटरटेनरनेचा धमाका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे यात शंका नाही.

    या चित्रपटासाठी अभिनेत्री ऐश्वर्या रॅायला विचारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ऐश्वर्या रॅाय आणि रजनिकांत यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. हे दोघही यापुर्वी रोबोट चित्रपटात काम केलयं. या चित्रपटातील दोघांची केमेस्ट्री लोकांच्या पंसतीस उतरली होती.