पेप्सी मनी हाइस्टच्या व्हर्च्युअल फॅन पार्टीने रचले नवे रेकॉर्ड्स

पेप्सी हा जगातील पहिली कन्झ्युमर पॅकेज्ड गुड्स (सीपीजी) ब्रँड आहे ज्याने यूट्यूबवर असा लाईव्ह कार्यक्रम (Live Programme) सादर केला. जगभरात यूट्यूबवर पहिल्यांदाच अशा प्रकारचा लाइव्ह कार्यक्रम सादर करून नवे मापदंड रचणे असो की या लाइव्ह कार्यक्रमातून ट्विटर आणि एमएक्स प्लेअरवरील व्ह्यूजचे नवे मापदंड रचणे असो

  • फक्त एका तासात एमएक्स प्लेअरवर २.४ दशलक्ष व्ह्यूजचा नवा जागतिक विक्रम
  • यूट्युब, ट्विटर आणि एमएक्स प्लेअरवर ९.१ दशलक्ष व्ह्यूज

नवी दिल्ली : पेप्सीने (Pepsi) नेटफ्लिक्सवरील (Netflix) मनी हाइस्ट (Money Hists) या लोकप्रिय सीरिजसाठी आयोजित केलेल्या व्हर्च्युअल फॅन पार्टीमुळे (Virtual Fan Party) सगळीकडेच उत्साहाचं वातावरण होतं आणि चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात या पार्टीला हजेरी लावून हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी केला. या पार्टीने काही नवे विक्रम रचले. मॅक्स प्लेअरवर (MX Player) २.४ दशलक्ष इतके आजवरचे सर्वाधिक व्ह्यूज, यूट्यूबवर (youtube) ३.३ दशलक्ष इतके व्ह्यूज आणि ट्विटरवर ३.४ दशलक्ष व्ह्यूज असे दणदणीत व्ह्यूज फक्त २४ तासांत या कार्यक्रमाला मिळाले.

पेप्सी हा जगातील पहिली कन्झ्युमर पॅकेज्ड गुड्स (सीपीजी) ब्रँड आहे ज्याने यूट्यूबवर असा लाईव्ह कार्यक्रम (Live Programme) सादर केला. जगभरात यूट्यूबवर पहिल्यांदाच अशा प्रकारचा लाइव्ह कार्यक्रम सादर करून नवे मापदंड रचणे असो की या लाइव्ह कार्यक्रमातून ट्विटर आणि एमएक्स प्लेअरवरील व्ह्यूजचे नवे मापदंड रचणे असो… हा ब्रँड सातत्याने आणि यशस्वीरित्या तरुणांशी ऑनलाइन जगतात जोडला जात आहे आणि यातून एक नवी संस्कृती निर्माण होत आहे… ग्राहकांसाठी खास क्युरेटेड डिजिटल कंटेंट सादर करण्याची संस्कृती.

पेप्सीको इंडियाच्या पेप्सी कोलाच्या कॅटेगरी लीड सौम्या राठोड म्हणाल्या : “पेप्सी-मनी हाईस्ट फॅन पार्टीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. ग्राहकांनी आमच्यावर दर्शवलेल्या प्रेमामुळे असे पथदर्शक उपक्रम हाती घेण्यासाठी नवे प्रोत्साहन आम्हाला मिळाले आहे आणि यातून सोशल मिडियावरचे विक्रम मोडीत काढून नवे मापदंड रचण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली आहे. फक्त २४ तासांमध्ये आम्हाला व्ह्यूज आणि एंगेजमेंटची जी प्रचंड आकडेवारी लाभली ती अत्यंत सुखावणारी होती आणि यातून आमच्या ग्राहकांसाठी नव्या युगातील मार्केटिंग अनुभव सातत्याने निर्माण करण्याचा आत्मविश्वास आम्हाला लाभला आहे.”

पेप्सी हा ब्रेव्हरेज ब्रँड आणि नेटफ्लिक्स ही जगातील आघाडीची स्ट्रीमिंग एंटरटेनमेंट सेवा भारतात पहिल्यांदाच एकत्र आली आणि त्यांनी मनी हाईस्ट या जगभरात नावाजल्या गेलेल्या सीरिजचा फिनाले साजरा केला. या उपक्रमाचा भाग म्हणून, हा उत्साह अधिक वाढवण्यासाठी या ख्यातनाम सीरिजच्या प्रेरणेतून गोल्डन कॅन्स आणि पॅक्स तयार करण्यात आले होते तसेच ऑक्टोबरमध्ये २०२१ मधील सर्वात उत्साही आणि अप्रतिम अशी व्हर्च्युअल फॅन पार्टीही आयोजित करण्यात आली होती.