chandane shimpit jave

आपलीच वाटेल अशी तिची कहाणी ‘चांदणे शिंपीत जाशी’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर 28 डिसेंबरपासून सुरू होतेय. एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेते आणि  आपल्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभी राहते. ही आहे चारूची गोष्ट. चारूच्या वडिलांचं एक गॅरेज आहे आणि ते आता चारू चालवते आहे. मुलगी असूनही मेकॅनिकची सर्व कामं सराईतपणे करते. तिला स्वतःचं गाड्यांचं शोरूम सुरू करायचं आहे. आपल्या लहान भावाला शिकवायचं आहे. वसंत नारकर हे चारूचे वडील  दारूच्या आहारी गेलेले असून त्यांना चारूबद्दल कोणत्याही प्रकारची आपुलकी किंवा कौतुक नाही. चारूच्या मोठ्या भावाला, दीपकलासुद्धा आपण खूप काही  आहोत आणि चारू आपल्यासमोर कोणीच नाही, असं वाटत असतं.

chandane shimpit jave

समाजातल्या अशा स्त्री वर्गाचं प्रतिनिधित्व चारू करते आहे, ज्या स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी खंबीरपणे काम करून आपलं घर चालवयताहेत, आपली आणि आपल्या घरच्यांची स्वप्न पूर्ण करताहेत आणि त्यासाठी कष्ट घेताहेत. चारू हे पात्र अभिनेत्री अमृता धोंगडे साकारत आहे. त्याचबरोबर मालिकेत सचित पाटील हा अभिनेताही  दिसणार आहे. त्याचप्रमाणे इतर नावाजलेले आणि दिगज्ज कलाकारही या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

प्रत्येकीला आपलीच वाटेल अशी आहे चारूची कहाणी. पाहा, ‘चांदणे शिंपीत जाशी’ ही नवी मालिका २८ डिसेंबरपासून संध्या. ७.३० वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.