tumchi mulgi kay karte

सोनी मराठी(Sony Marathi) वाहिनीवर लवकरच ‘तुमची मुलगी काय करते ?’(Tumchi Mulgi Kay Karte) ही नवीन मालिका सुरू होत आहे. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो(Tumchi Mulgi Kay Karte Promo) प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, अभिनेत्री मधुरा वेलणकर(Madhura Welankar) मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

    छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी अनोखं आणि प्रवापेक्षा वेगळा प्रयत्न सोनी मराठी वाहिनीनं केला आहे. हिच परंपरा जपत सोनी मराठी(Sony Marathi) वाहिनीवर लवकरच ‘तुमची मुलगी काय करते ?’(Tumchi Mulgi Kay Karte) ही नवीन मालिका सुरू होत आहे. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो(Tumchi Mulgi Kay Karte Promo) प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, अभिनेत्री मधुरा वेलणकर(Madhura Welankar) मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

    अभिनेता हरीश दुधाडे पोलीस इन्स्पेक्टरची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मालिकेची निर्माती मनवा नाईक असून, संवाद मुग्धा गोडबोले, कथा-पटकथालेखन चिन्मय मांडलेकर करणार आहे. लवकरच प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर एक थरारक मालिका बघायला मिळणार आहे.

    मालिकेविषयी अधिक माहिती हळूहळू रिव्हील करण्यात येणार असल्याचं वाहिनीच्या वतीनं सांगण्यात येत आहे. या मालिकेच्या रूपात थरारक मालिकांच्या चाहत्यांसाठी जणू एक वेगळा फ्लेव्हर सादर करण्यात येणार असल्याची जाणीव ‘तुमची मुलगी काय करते?’चा प्रोमो पाहिल्यावर होते. पालक आणि पाल्य यांमधील नातेसंबंधांसोबत समाजात घडणाऱ्या घडामोडींचा वेधही या मालिकेच्या निमित्ताने घेण्यात येणार असल्याचं जाणवतं. या मालिकेत नेमकं काय पाहायला मिळणार हे कोडं लवकरच उलगडेल.