maza hoshil na

‘माझा होशील ना’ या झी मराठीवरील मालिकेमधला नव्या रंजक घडामोडींनी प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलेलं आहे. आदित्यला दापोलीमधे गाठून सईने तिचं प्रेम जाहिर केलंय, पण आदित्यने मात्र त्यागभावनेने सईला नकार दिलाय. असं घडत असतानाच मालिकेचा एक प्रोमो सोशल मिडिया आणि टिव्हीवर झळकू लागलाय ज्याने उत्कंठा अधिकच ताणली गेलीये आणि प्रेक्षकांमधे चर्चा रंगू लागलीये.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

हा प्रोमो सई आदित्यच्या लग्नानंतरचा असून ह्यात सई मामांच्या हट्टापायी उखाणा घेताना दिसतेय. मुंडावळ्या,हार आणि पारंपारिक वेष परिधान केलेले सई आदित्य सायकलवरुन निघालेले दिसताएत. हे सगळं कधी घडणार आहे? की पुन्हा हे काही स्वप्नं दाखवलं जात नाहिये ना? असे प्रश्न सगळ्यांनाच पडत आहेत. ह्याबद्दल आमच्या सूत्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केल्यावर समजलं की, आदित्य आणि सईचं लग्न होणार हे १००% खरं असून त्या दिशेने प्रवास सुरुही झालाय. पण एकमेकांपासून दूर जाण्याच्या प्रयत्नात असलेले सई आणि आदित्य खऱ्या प्रेमाने आणि नशीबाने कसे एकमेकांकडेच ओढले जाणार आहेत हे आता पहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

प्रेमाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात आणि त्या कितीही तोडायच्या म्हटल्या तरी तुटत नाहित असं जे म्हटलं जातं, ते प्रत्यक्षात होताना आता पहायला मिळणार आहे. सई आणि आदित्यचा एकमेकांपासून विलग होण्यापासून ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्यापर्यंतचा भन्नाट प्रवास आता दिसणार आहे. तर, लग्नघटिका समीप तर येतेय, पण तोवर काय काय नव्या अडचणी आणि क्षण येताएत ते पाहूया! कारण ह्यातूनच तावून सुलाखून सई-आदित्यचं प्रेम अजून मजबूत होणार आहे. ‘माझा होशील ना’ सोमवार ते रविवार रात्री ९.वा. फक्त आपल्या झी मराठीवर.