बॉलिवूडची दिवाळी यंदाही फिकीच राहणार, जंगी सेलिब्रेशन नाही?

अनिल कपूर, अमिताभ बच्चन, एकता कपूर आणि शिल्पा शेट्टी यांसारखे अनेक सेलिब्रिटी, जे बॉलीवूडमध्ये मोठ्या दिवाळी पार्ट्यांचे आयोजन करतात, यावर्षी देखील पार्टी करण्याच्या मूडमध्ये नाहीत. असे बोलले जात आहे की एकता कपूर तिच्या खास लोकांसोबत घरी छोटीशी पार्टी करू शकते, तर शिल्पा शेट्टी तिचा पती पॉर्न प्रकरणात अडकल्यामुळे यावर्षी कोणतीही पार्टी करणार नाही.

    मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) दरवर्षी सेलिब्रिटीज पूर्ण धुमधडाक्यात दिवाळी (Diwali Party 2021) साजरी करतात. या निमित्ताने सेलेब्स जंगी पार्ट्या करतात. या पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral On Social Media) होतात. तथापि, गेल्या वर्षी कोरोनाने (Covid-19) संपूर्ण विश्वात कहर केला त्यामुळे बॉलिवूडच्या पार्ट्यांनाही ब्रेक लागला. आता असं वाटतंय की, यंदाही बॉलिवूडची दिवाळी फिकीच (no party celebration) राहणार आहे.

    काही मीडिया रिपोर्ट्नुसार, अनिल कपूर, अमिताभ बच्चन, एकता कपूर आणि शिल्पा शेट्टी यांसारखे अनेक सेलिब्रिटी, जे बॉलीवूडमध्ये मोठ्या दिवाळी पार्ट्यांचे आयोजन करतात, यावर्षी देखील पार्टी करण्याच्या मूडमध्ये नाहीत. असे बोलले जात आहे की एकता कपूर तिच्या खास लोकांसोबत घरी छोटीशी पार्टी करू शकते, तर शिल्पा शेट्टी तिचा पती पॉर्न प्रकरणात अडकल्यामुळे यावर्षी कोणतीही पार्टी करणार नाही.

    मात्र, मनीष मल्होत्रा आणि रमेश तौरानी यांनी त्यांच्या घरी एक पार्टी दिली ज्यामध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. सलमान खानची बहीण अर्पिता खानही तिच्या खास लोकांसोबत तिच्या घरी पार्टी करणार आहे. शाहरुख खान देखील यावेळी पार्टी करणार नाही कारण त्याचा मुलगा आर्यन खान नुकताच ड्रग्ज प्रकरणात तुरुंगातून बाहेर आला आहे. अमिताभ बच्चन देखील आपल्या कुटुंबासोबतच दिवाळी साजरी करणार असल्याचे मानले जात आहे.