james bond no time to die

महाराष्‍ट्रातील चित्रपटप्रेमींनाही जेम्स बॉण्डच्या नव्या चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे. कारण ‘नो टाईम टू डाय’(No Time To Die Release In Maharashtra) हा चित्रपट आता २२ ऑक्‍टोबर रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्‍ये प्रदर्शित होणार आहे.

    हॉलिवूडमधील जेम्‍स बॉण्‍डचा(James Bond Movie) ‘नो टाइम टू डाय’ (No Time To Die) चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. जगभरात लाखो चाहते असलेल्या या फ्रेंचायझीच्या २५ व्या चित्रपटाचे खूप कौतुक करण्यात आले. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.(No Time To Die Release Date In Maharashtra)

    चित्रपट समीक्षकांनीदेखील चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. डॅनियल क्रेगचा बेस्ट फेअरवेल असा सर्वोत्तम चित्रपट असल्‍याचे मानत आहेत. दरम्यान, महाराष्‍ट्रातील चित्रपटप्रेमींनाही या चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे. कारण ‘नो टाइम टू डाय’ हा चित्रपट आता २२ ऑक्‍टोबर रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्‍ये प्रदर्शित होणार आहे.

    चित्रपटाचे दिग्‍दर्शक कॅरी फुकुनगाबाबत बोलताना डॅनियल क्रेग म्‍हणाले, जे अनेक चित्रपटांच्‍या बाबतीत घडले आहे, त्यावर आम्ही चर्चा केली. जेम्स बॉण्‍ड अभिनीत चित्रपट नेहमीच प्रकाशझोतात राहिले आहेत. हे नेहमीच प्रशंसनीय राहिलं आहे. ते दूरदृष्‍टी असलेल्‍या दिग्‍दर्शकांपैकी एक आहेत आणि त्‍यांची व्हिज्‍युअल शैली अत्‍यंत प्रबळ आहे.