नोरा फतेहीचा जॅकलीन फर्नांडिस विरोधातील मानहानीचा खटला! 25 मार्चला होणार सुनावणी

नोरा फतेहीने जॅकलीन फर्नांडिसविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. आता दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने नोराच्या बदनामीच्या तक्रारीवर 25 मार्चला सुनावणी निश्चित केली आहे.

    गँगस्टर सुकेश चंद्रशेखरच्या (sukesh chandrashekhar)  200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी नोरा फतेही (nora fatehi) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणी नोराने जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. आता दिल्लीच्या पटियाला हाऊस ( Patiala House Court of Delhi) कोर्टाने नोरा फतेहीच्या तक्रारीवरुन 25 मार्चला सुनावणी निश्चित केली आहे. या प्रकरणात तिचे नाव चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.

    अभिनेत्री नोरा फतेहीने नुकतचं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि विविध माध्यम संस्थांविरोधात दिल्ली न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात आपले नाव विनाकारण आणण्यात आल्याचा दावा नोराने तक्रारीत दावा केला आहे. तिचा सुकेशशी काहीही संबंध नाही. ती सुकेशला त्याची पत्नी लीना मारिया पॉस यांच्यामुळेच ओळखत असल्याचही ती म्हणाली आहे.