baipan bhari deva

जिओ स्टुडिओजने आजपासून चित्रपटाच्या तिकिटावर कमालीची सूट देत फक्तं १०० रुपयांत सिनेमा दाखविण्याची घोषणा केली आहे.

    बाईपण भारी देवा (Baipan Bhari Deva) चित्रपटाच्या स्टारकास्टचा एक धम्माल व्हिडिओ सध्या आऊट झाला आहे. त्यात दीपाने तिच्या दादाला, शिल्पाने काकांना, रोहिणी हट्टंगडीने मामाला, सुचित्राने तिच्या मेव्हण्यांना, सुकन्याने तिच्या ड्रायवरला तर वंदना गुप्तेनीं चक्क त्यांच्या फॅमिली डॉक्टरलाच धारेवर धरत फिल्म बघायला जायचं आवाहन केलं आहे. येणारा सुट्ट्यांचा आठवडा बघता, जिओ स्टुडिओजने आजपासून चित्रपटाच्या तिकिटावर कमालीची सूट देत फक्तं १०० रुपयांत सिनेमा दाखविण्याची घोषणा केली आहे. आता महाराष्ट्रातील प्रत्येक चित्रपटगृहात प्रेक्षकांना या नव्या अॅाफरचा आपल्या कुटुंबासोबत आनंद घेता येणार आहे.

    चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद

    आतापर्यंत बायकांनी थिएटर्स तुडुंब भरलेली होती परंतु गेल्या काही दिवसांत पुरुषांचा ही सिनेमाकडे झुकलेला कल पाहता, चित्रपटांतील अभिनेत्रींचा एक गमतीशीर व्हिडियो सोशल मीडियावर आऊट केला आहे तो बघता खरंच वाटतंय बाईपण भारी देवा! जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि स्वतः जिओ स्टुडिओनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट पहायला मिळते.

    बॅाक्स ऑफिसवरही सुसाट

    जून महिन्यात ३० तारखेला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचं महाराष्ट्रतल्या प्रेक्षकांना चांगलच वेड लागलं. मराठीतला सगळ्यात जास्त कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला आहे. या सिनेमानं वेड सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. या सिनेमाने आतापर्यंत 75.77  कोटींचा व्यवसाय केला आहे.