
अभिनेता रजनीकांतचा 'जेलर' हा सिनेमा रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. या चित्रपटाबाबत दाक्षिणात्या प्रेक्षकवर्गात प्रचंड क्रेझ आहे. नुकताच जेलरचा प्रोमो रिलीज झाला, जो पाहून लोकांची उत्कंठा वाढली आहे. आता चित्रपटाशी संबंधित एक अनोखी गोष्ट समोर आली आहे जी रजनीकांतच्या चाहत्यांची मजा द्विगुणित करू शकते.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) यांच्या ‘जेलर’ (Jailer) या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या गुरुवारी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे प्रमोशन जोरात करण्यात आले आहे. ‘जेलर’चा ट्रेलर आणि आता प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये रजनीकांतचा स्वॅग पाहण्यासारखा आहे. रजनीकांतच्या चित्रपटाचं वेड असणाऱ्या दक्षिणेकडील राज्यात खास चित्रपटाच्या रिलिजच्या दिवशी काही कार्यालयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे.
रजनीकांतची क्रेझ
अभिनेता रजनीकांतची क्रेझ फक्त दक्षिणेकडील राज्यांनाच नाही तर संपूर्ण देशात आहे. देशभरातील त्यांचे फॅन्स त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत असतात. अखेर फॅन्सची ही इच्छा लवकरत पूर्ण होणार आहे. त्यांच्या उत्सुकता पाहता जेलक चित्रपट संपूर्ण भारतातील बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपन करेल अशी अपेक्षा आहे. रजनीकांत तब्बल दोन वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. अशा परिस्थितीत, निर्मात्यांनी चित्रपटाच्या मोठ्या ओपनिंगसाठी सर्व प्रयत्न केले आहेत. ‘जेलर’बाबत एक बातमी येत आहे की, काही शहरांमध्ये चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी ऑफिसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रिलीजच्या दिवशी सुट्टी असेल!
वृत्तानुसार, चेन्नई आणि बेंगळुरूमधील अनेक कार्यालयांनी 10 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केली आहे. या चित्रपटाने आपल्या नवीन प्रोमोने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. सुपरस्टार रजनीकांतचा क्रेझ न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवरही पोहोचल्याच पाहायला मिळालं. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाला चांगली स्क्रीन प्रेझेन्स मिळण्याची अपेक्षा आहे. वृत्तानुसार, अॅडवान्स बुकिंगमध्ये चित्रपटाने परदेशात 10 कोटींचा टप्पा पार केला आहे.
रजनीकांत यांची दमदार भूमिका
नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत पोलीस अधिकाऱ्याच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. जेलर हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे. मुळात हा चित्रपट तामिळ भाषेत आहे. याशिवाय हा चित्रपट हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तमन्ना भाटिया देखील या चित्रपटात आहे.