sonalee kulkarni

सोनालीची यावर्षी पहिलीच वटपोर्णिमा. पण दुंबईत असल्यामुळे सोनालीला ती साजरी करता आली नाही.

  आज वटपोर्णिमा.  प्रत्येक विवाहित महिलेच्या आयुष्यात वटपौर्णिमा सणाचे एक वेगळेच महत्त्व असते. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रत्येक स्त्री या दिवशी वटवृक्षाची पूजा करते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ७ मे रोजी दुबईत कुणाल बेनोडेकर याच्याशी लग्न केले. सोनालीची यावर्षी पहिलीच वटपोर्णिमा. पण दुंबईत असल्यामुळे सोनालीला ती साजरी करता आली नाही. मात्र या दिवशी नट्टापट्टा करण्याची संधी तिने अजिबात सोडली नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

  सोनालीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत आणि म्हटलं आहे की, ‘’आज वटपौर्णिमा… माझी पहिलीच, जरी साजरा करता येत नसली तरी…. जरा नटावं म्हणलं… बाकी नवऱ्याला उत्तम, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना… ‘वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा’ ता.क.- कारण येथे वटवृक्ष नाही” असं कॅप्शन देत सोनालीने हे फोटो शेअर केले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

   

  सोनाली सध्या पतीसोबत दुबईत राहत आहे. दुबईत वटवृक्ष नसल्याने सोनालीला पहिली वटपौर्णिमा साजरी करता आली नाही.