भारतरत्न पी. व्ही. नरसिंह यांच आयुष्य उलगडणार, त्यांच्यावर आधारित वेबसिरिज लवकरच येणार भेटीला!

या वेबसिरीजं दिग्दर्शक प्रकाश झा हे दिग्दर्शन करणार असून ही वेब सिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    गेल्या अनेक दिवसापासून सिनेक्षेत्रात वेगवेगळ्या विषयावर आधारित चित्रपट, वेबसिरिज तयार होत आहे. राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकही प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.  या बायोपिकला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्यावर बायोपिक वेबसिरीजच्या (Web Series On pv narasimha rao ) स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अहा स्टुडिओ आणि ॲप्लॉज एंटरटेनमेंटने पीव्ही नरसिंह राव यांच्यावर बायोपिक बनवण्याची घोषणा केली आहे.

    केंद्र सरकारकडून माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव ( PV Narasimha Rao) यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. पीव्ही नरसिंह राव यांनी 1991 ते 1996 या काळात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करत त्यांना या सर्वेच्च सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे. आता त्यांच आयुष्य उलगणार असून त्यांच्यावर आधारित वेबसिरीज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

    पीव्ही नरसिंह राव यांचा हा बायोपिक प्रसिद्ध लेखक विनय सीतापती यांच्या ‘हाफ लायन’ या पुस्तकावर आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये पीव्ही नरसिंह राव यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा 1990 च्या दशकाची गोष्ट सांगितली जाणार आहे. या वेब सीरिजमध्ये पीव्ही नरसिंह राव यांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये. तसेच या वेबसीरिजमधील कलाकरांबाबतही कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये. त्यामुळे सध्या या भूमिकेसाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरु आहे.