oppenheimer photo 1

ज्यांना ओपनहायमर चित्रपट मोठ्या पडद्यावर बघता आला नाही, ते प्रेक्षक घरात बसून OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात.

    प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांनी दिग्दर्शित केलेला ‘ओपनहायमर’ हा चित्रपट (Oppenheimer) 21 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पंसतीस उतरला. ‘ओपनहायमर’ बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त हिट ठरला होता. हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बघता येणार आहे.  Zee5 आणि Amazon Prime या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाला आहे. मात्र, हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला पैसै मोजावे लागणार आहे.

    ज्यांना ओपनहायमर’  चित्रपट मोठ्या पडद्यावर बघता आला नाही, ते प्रेक्षक घरात बसून या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. OTT प्लॅटफॉर्म ZEE5 ने त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डलवर ‘Openheimer’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

     ‘ओपेनहायमर’ चित्रपटाची कथा वैज्ञानिक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांना अणुबॉम्बचा शोधक म्हटले जाते. सिलियन मर्फी व्यतिरिक्त रॉबर्ट डाउनी जेआर, एमिली ब्लंट आणि मॅट डॅमन यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.