चित्रपटात ऐश्वर्याबरोबर कधीच किसींग सीन का देत नाही? अभिषेकने दिलं ‘हे’ उत्तर!

अभिषेक म्हणाला, किसिंग सीन असलेला चित्रपट आजवर आम्हाला मिळालेला नाही. पाश्चिमात्य संस्कृतीत किस करणं हे खूप सामान्य आहे. पण भारतात याकडे लोक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. कलाकार विविध लोकेशनवर जातात आणि नाचून आपलं प्रेम व्यक्त करतात.

  अभिनेता अभिषेक बच्चन आणि पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आजवर रोमँटिक, अक्शन, विनोदी अशा जवळपास सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र असं असताना देखील त्यानं आजवर आपल्या पत्नीला चित्रपटांमध्ये किस का केलं नाही? असा सवाल त्याला वारंवार केला जातो. अखेर या प्रश्नाचं उत्तर त्यानं आपल्या चाहत्यांना दिलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

  प्रसिद्ध समिक्षक ओपरा विनफ्रे यांनी घेतलेल्या सेलिब्रिटींच्या मुलाखती कायमच चर्चेत असतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत त्यांनी दोघांना विविध प्रकारचे सवाल केले. परंतु किसिंगबाबत केलेल्या प्रश्नामुळं दोघंही अवाक् झाले. ऐश्वर्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं चित्रपटांमध्ये अनेकदा किसिंग सीन केले आहेत. परंतु अभिषेकसोबत तिनं एकदाही किसिंग सीन का केला नाही? असा सवाल तिनं केला होता. या प्रश्नावर अभिषेकनं उत्तर दिलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

   

  अभिषेक म्हणाला, किसिंग सीन असलेला चित्रपट आजवर आम्हाला मिळालेला नाही. पाश्चिमात्य संस्कृतीत किस करणं हे खूप सामान्य आहे. पण भारतात याकडे लोक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. कलाकार विविध लोकेशनवर जातात आणि नाचून आपलं प्रेम व्यक्त करतात. कुटुंबासोबत हा चित्रपट पाहता येईल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. त्यामुळं आम्ही किसिंग सीन टाळून संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येईल अशाच चित्रपटांमध्ये काम करतो.”