ऑस्कर विजेते प्रसिद्ध चित्रपट निर्माते रॅाजर कॅार्मन यांचं निधन, अनेक हॅालिवूड सुपरस्टार्सना चित्रपटामध्ये दिला ब्रेक

रॉजर कॉर्मन यांचे गुरुवारी, 9 मे रोजी निधन झाले. कॅलिफोर्नियातील सांता मोनिका येथील त्यांच्या घरी कुटुंबासोबत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  हॅालिवूड जगातून दुखद बातमी समोर येत आहे. हॅालिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते रॅाजर कॅार्मन यांचx निधन (roger corman passes away) झालंय. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ऑस्कर विजेते कार्मन यांनी अनेक स्टार कलाकारांना हॅालिवूडमध्ये ब्रेक दिला होता. त्यांच्या निधनाने हॅालिवूड चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
  रॅाजर कॅार्मन यांची मुलगी कॅथरीने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाची बातमी दिली.
  एका निवेदनाद्वारे कॅथरीनने सांगितले की तिचे वडील रॉजर कॉर्मन यांचे गुरुवारी, 9 मे रोजी निधन झाले. कॅलिफोर्नियातील सांता मोनिका येथील त्यांच्या घरी कुटुंबासोबत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  रॅाजर कॅार्मन यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट बनवले आणि अनेक हॉलीवूड सुपरस्टार्सना आपल्या चित्रपटांमध्ये ब्रेक दिला.

  हॅालिवूडला दिले अनेक सुपरहिट चित्रपट

  रॉजर कॉर्मन चित्रपट उद्योगात बी-चित्रपट म्हणून ओळखले जात होते. 1940 मध्ये त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ते कुटुंबासह कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक झाले. आपल्या करिअरमध्ये त्याने बकेट ऑफ ब्लड, ब्लॅक स्कॉर्पियन, ब्लडी मामा असे अनेक सुपरहिट चित्रपट केले होते. जेम्स कॅमेरॉन, रॉन हॉवर्ड आणि मार्टिन स्कोर्सेस यांसारख्या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांनाही यामुळे ब्रेक मिळाला.

  ऑस्कर पुरस्काराने करण्यात आलं होतं सन्मानित

  चित्रपट निर्माते रॉजर कॉर्मन यांनी चित्रपटांमध्ये आपली छाप पाडली होती. रॉजर यांच्या कामाचं वैशिष्ट्य  म्हणजे तो खूप कमी बजेटमध्ये चित्रपट बनवत असे. 2009 मध्ये त्यांना मानद अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय किंग ऑफ द बीएससाठी त्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. अशा महान चित्रपट निर्मात्याचे जाणे हॉलिवूड चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान आहे.