ऑल रिअ‍ॅलिटी ऑन-डिमांड स्ट्रीमिंग सर्व्हिस हायु भारतात दाखल

रिॲलिटी प्रकारच्या कार्यक्रमांचे चाहते असणाऱ्या प्रेक्षकांच्या मोठ्या वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून हायुने सर्वोत्तम रिॲलिटी टीव्ही कार्यक्रमांचे (Reality TV Shows) ८,००० हून अधिक एपिसोड्स उपलब्ध करून दिले आहेत. यात कीपिंग अप विथ द कार्डेशियन्सच्या अगदी पहिल्या भागापासून ते शेवटच्या सीझनपर्यंतचे सगळे भाग तसेच त्यातून निघालेल्या इतर मालिका त्याचबरोबर द रिअल हाऊसवाइव्ह्ज, टॉप शेफ, मिल्यन डॉलर लिस्टिंग आणि फॅमिली कर्मा यांसारख्या अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे.

  • एनबीसी युनिव्हर्सची ॲड-फ्री सबस्क्रिप्शन योजना आता २८ क्षेत्रांमध्ये उपलब्ध

मुंबई : NCB Universal च्या संपूर्णपणे रिअलिटी आधारित कार्यक्रमांना समर्पित आणि अ‍ॅड-फ्री सबस्क्रिप्शन (Ad-Free Subscription) देणारी व्हिडिओ ऑन-डिमांड (एसव्हीओडी) स्ट्रीमिंग सेवा हायु (hayu) भारतात दाखल झाली आहे. मोबाइल, टॅब्लेट, लॅपटॉप कनेक्टेड टीव्ही आणि निवडक कन्सोल्स अशा सर्व प्रकारच्या उपकरणांवर चालू शकणारी डायरेक्ट-टू-कन्झ्युमर (डीटीसी) सेवा देऊ करणारे हायु भारतात प्रथमच उपलब्ध होत आहे.

रिॲलिटी प्रकारच्या कार्यक्रमांचे चाहते असणाऱ्या प्रेक्षकांच्या मोठ्या वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून हायुने सर्वोत्तम रिॲलिटी टीव्ही कार्यक्रमांचे (Reality TV Shows) ८,००० हून अधिक एपिसोड्स उपलब्ध करून दिले आहेत. यात कीपिंग अप विथ द कार्डेशियन्सच्या अगदी पहिल्या भागापासून ते शेवटच्या सीझनपर्यंतचे सगळे भाग तसेच त्यातून निघालेल्या इतर मालिका त्याचबरोबर द रिअल हाऊसवाइव्ह्ज, टॉप शेफ, मिल्यन डॉलर लिस्टिंग आणि फॅमिली कर्मा यांसारख्या अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे.

हायुजवळील कार्यक्रमांचा पट आपल्या अनोखेपणामुळे रिअलिटी कार्यक्रमांच्या चाहत्यांच्या अपेक्षांची पुरेपूर पूर्तता करतो. या सेवेमध्ये रिअलिटी कार्यक्रमांबरोबरच इंग्रजी भाषेतील गृहसजावट, डेटिंग, कुकिंग, फॅशन आणि ट्रु क्राइम अशा उपप्रकारांच्या अनस्क्रिप्टेड आवृत्तींच्या विस्तृत श्रेणीमधून आपल्या आवडत्या कार्यक्रमांची निवड करण्याची मुभाही मिळते. शिवाय या सेवेच्या सबस्क्रायबर्सना एखाद्या कार्यक्रमात पुढे काय घडले ते आधीच समजण्याची भीतीही बाळगण्याची गरज नाही, कारण येथील बहुतांश अमेरिकन कार्यक्रम हे अमेरिकेमध्ये ज्या दिवशी प्रदर्शित होतील त्याच दिवशी हायुवरही उपलब्ध होतात.

“भारतामध्ये रिअलिटी टीव्ही कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद मिळतो. अशा देशामध्ये हायु सेवा सुरू करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे व भारतीय प्रेक्षकांना सर्वोत्तम अनस्क्रिप्टेड कन्टेन्ट भरभरून देण्यास आम्ही उत्सुक आहोत. “डिरेक्ट टू कन्झ्युमर- ग्लोबल विभागाचे मॅनेजिंग डिरेक्टर हेंद्रिक मॅकडरमॉट म्हणाले. “आवर्जून बघाण्यासारखे रिअलिटी टीव्ही कार्यक्रम पाहण्याचे एक अव्वल दर्जाचे स्थळ म्हणून हायुने २७ देशांमध्ये आपली ओळख आधीच तयार केली आहे आणि आता हीच उत्कृष्ट सेवा आता भारतालाही उपलब्ध होणार आहे.”

हायुने आवर्जून हवीच अशी संपूर्णपणे रिअलिटी कार्यक्रमांना वाहिलेली सेवा ही आपली खास ओळख विविध बाजारपेठांमध्ये तयार केली आहे. रिअलिटी कार्यक्रमांच्या चाहत्यांना आता ही सेवा तीन महिन्यांसाठी रु. ३४९ किंवा १२ महिन्यांसाठी रु. ९९९ रुपयांच्या प्रीपेड पाससह या सेवेचे सदस्यत्व घेता येईल.