माऊंटन ड्यूचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुपरस्टार महेश बाबू याची निवड झाल्याने देशभरात उत्साहाची लाट

माऊंटन ड्यूने (Mountain Dew) गेल्या अनेक वर्षांत तरुणांमध्ये आपल्या ब्रँड संदेशाची छाप उमटवली आहे. जगात प्रत्येकाला कशा ना कशाची भीती वाटतेच, पण जे त्या भीतीवर मात करून आव्हानांना थेट सामोरे जातात, तेच विजेते ठरतात, खरे नायक ठरतात, असे ब्रँडचे तत्त्वज्ञान सांगते. महेश बाबूने तेलुगू सिनेमामध्ये केलेल्या कामाचे फार मोठे कौतुक झाले आहे आणि त्याचा चाहतावर्ग भारतभरात पसरलेला आहे.

  • डर के आगे जीत है, हे तत्त्वज्ञान पुनर्प्रस्थापित करण्यासाठी आखलेल्या ब्रँडच्या धमाकेदार कॅम्पेन्समध्ये महेश बाबूची मुख्य भूमिका
  • माऊंटन ड्यूचा भारतभरातील प्रसार आणखी सखोल करण्यासाठी ही भागीदारी

हैदराबाद : माऊंटन ड्यूने (Mountain Dew) कायमच असामान्य यश कमावण्यासाठी जोखीम पत्करण्याच्या, सीमारेषा पार करून जाण्याच्या जिगरबाज वृत्तीला सलाम केला आहे. तरुणांना प्रेरणा देण्याच्या याच प्रयत्नांचा भाग म्हणून माऊंटन ड्यूने प्रख्यात अभिनेता आणि सुपरस्टार महेश बाबू (Superstar Mahesh Babu) याला ब्रँड अँबॅसेडर (Brand Ambassador) म्हणून निवडले आहे. माऊंटन ड्यू आणि महेश बाबू यांच्यातील ही हाय व्होल्टेज भागीदारी या ब्रँडची पोहोच आणखी वाढवेल आणि ‘डर के आगे जीत है’ हे ब्रँडचे लोकप्रिय तत्त्वज्ञान प्रत्यक्षात आणेल.

माऊंटन ड्यूने (Mountain Dew) गेल्या अनेक वर्षांत तरुणांमध्ये आपल्या ब्रँड संदेशाची छाप उमटवली आहे. जगात प्रत्येकाला कशा ना कशाची भीती वाटतेच, पण जे त्या भीतीवर मात करून आव्हानांना थेट सामोरे जातात, तेच विजेते ठरतात, खरे नायक ठरतात, असे ब्रँडचे तत्त्वज्ञान सांगते. महेश बाबूने तेलुगू सिनेमामध्ये केलेल्या कामाचे फार मोठे कौतुक झाले आहे आणि त्याचा चाहतावर्ग भारतभरात पसरलेला आहे. या दोघांच्या चैतन्यशील भागीदारीतून अधिक साहस, अधिक उत्साह आणि अधिक धाडस यांच्या साथीने भारतभरातील ग्राहकांचा २०२२ चा उन्हाळा धडाकेबाज होऊन जाणार आहे.

या ताज्या घडामोडीवर टिप्पणी करताना विनीत शर्मा, कॅटेगरी डायरेक्टर- माऊंटन ड्यू आणि स्टिंग, पेप्सिको इंडिया म्हणाले, “आमचा ब्रँड आणि भारतभरातील त्याचे ग्राहक यांचे साहसी, धाडसी आणि बेधडक व्यक्तिमत्त्व जिवंत करणाऱ्या महेश बाबू यांच्यासोबत जोडले जाण्याचा आम्हाला अभिमान आहे. ‘डर के आगे जीत है’ या ब्रँडच्या तत्त्वज्ञानाचे साक्षात स्वरूप असलेल्या महेश बाबू यांचा देशभरात फार मोठा चाहतावर्ग आहे. आमच्या ब्रँडचा विस्तार करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये महेश बाबू हे ग्राहकांशी ब्रँडचे नाते अधिक गहिरे करण्यात फार मोलाचे योगदान देणार आहेत. आम्ही महेश बाबू यांना भीतीवर मात करणाऱ्या डेअरिंगबाज अवतारांमध्ये सादर करणार असल्याने माऊंटन ड्यूचा (Mountain Dew) २०२२ मधला प्रवास थरारक होईल आणि महेश बाबूंच्या चाहत्यांनाही जोश आणि प्रेरणा यांचा अनुभव मिळेल!”

टीव्हीसीच्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल बोलताना ब्रँड अँबॅसेडर महेश बाबू म्हणाले, “फिल्मस्टार म्हणून आम्ही साहसी आणि अपराजित असावे अशी अपेक्षा असली तरी प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भीतीचा अनुभव घेतो, असे मला वाटते. मात्र भीती आणि स्वत:विषयीची शंका यांच्यावर मात करण्यासाठी जो सर्व सीमा पार करतो, तो खरा हीरो असतो. ‘डर के आगे जीत है,’ हे माऊंटन ड्यूचे (Mountain Dew) तत्त्वज्ञान माझ्या विचारांशी मेळ खाणारे असल्यामुळे ते मला कायमच प्रचंड प्रमाणात भावलेले आहे. मला स्वत:ला अगदी टोकाला नेऊन आजमावायला आवडते आणि आमच्या प्रेक्षकांसाठी नव्याने जादू निर्माण करण्यासाठी माऊंटन ड्यूबरोबर हातमिळवणी करताना मला खूप आनंद होतो आहे.”

या धमाकेदार भागीदारीचा भाग म्हणून महेश बाबू ब्रँडच्या नव्या टीव्हीसी कँपेनमध्ये झळकणार असून २०२१ मध्येच हे कँपेन पारंपरिक आणि डिजिटल माध्यमांमध्ये सादर होणार आहे. माऊंटन ड्यू (Mountain Dew) भारतभरातील आधुनिक आणि पारंपरिक रिटेल आउटलेट्समध्ये आणि आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर सिंगल/मल्टि सर्व्ह पॅक्समध्ये उपलब्ध आहे.