सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी ओटीटीचा नवा फंडा, सुपरस्टार्सना दिली भली मोठी ऑफर!

फॅमिली मॅन 2 नंतर मनोज बाजपेयीला २०-२२ कोटी पर्यंत ऑफर केल्याची बातमी आहे. असा अंदाज वर्तविला जात आहे की ओटीटीला आता चांगली कामे करण्याबरोबरच बॉलिवूड स्टार्सचीही गरज भासू लागली आहे.

    आता भारतात ओटीटीची नेक्स लेवल सुरू झाली आहे. या मोठ्या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार्सना कोट्यावधी पैसे दिले जात आहेत. अजय देवगनला वेब सीरिजसाठी १२५ कोटींच्या ऑफर दिल्याची चर्चा आहे. यापूर्वी अक्षय कुमारलाही ९० कोटी ऑफर देण्यात आली होती.

    दुसरीकडे, फॅमिली मॅन 2 नंतर मनोज बाजपेयीला २०-२२ कोटी पर्यंत ऑफर केल्याची बातमी आहे. असा अंदाज वर्तविला जात आहे की ओटीटीला आता चांगली कामे करण्याबरोबरच बॉलिवूड स्टार्सचीही गरज भासू लागली आहे. या सर्व विकासामागे एक तर्क देखील आहे की ओटीटीमध्ये बॉलिवूडसारखी स्टार सिस्टम देखील सुरू होईल, परंतु काही विश्लेषकांचे मत आहे की वितरण वाहिनी, प्रकल्प मंजुरी आणि पेमेंट सिस्टमच्या बाबतीत ओटीटी बॉलिवूडपेक्षा खूप वेगळा आहे. म्हणून स्टार सिस्टम येथे वर्चस्व गाजवू शकत नाही.

    दरनिहाय धोरण

    १. देशातील ओटीटीचे सशुल्क ग्राहक ३ ते ५ कोटींच्या दरम्यान आहेत. आयपीएलसारख्या क्रीडा स्पर्धेदरम्यान ही संख्या वाढते. या कारणास्तव डिस्ने हॉटस्टार सर्वात वर आहे.

    २. खरी लढाई जनरल एंटरटेन्मेंटमध्ये होईल. यासाठी एक धोरण म्हणजे सबस्क्रिप्शन रेट. नेटफ्लिक्स प्रमाणेच सिंगल स्क्रीनवर महिन्याच्या १९९ रुपयांच्या योजनेमुळे नवीन समिकरणं तयार झाली आहेत.

    ३. दुसरीकडे अ‍ॅमेझॉन प्राइम आणि आता थोड्याफार प्रमाणात हॉटस्टार, मोबाइल कंपन्यांसह पॅकेज फॉर्म्युला वापरुन त्यांचे सबस्क्रीशन वाढवत आहेत.

    केबीसीच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी सोनी टीव्हीसाठीचा खेळ बदलला. सलमानने ‘बिग बॉस’ आणला आणि आमिरने ‘सत्यमेव जयते’ केले. आता ओटीटीमध्येही स्टार पॉवरचा खेळ सुरू होणार आहे. अजय देवगणन हॉटस्टारच्या ‘रुद्र’ वेब सीरिजमध्ये येत आहे. अक्षय कुमारचा ‘द एंड’ अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होईल.

    दहा भागांसाठी, कलाकाराला १ ते ३ कोटी आणि मोठ्या कलाकराला ३ ते ७ कोटी मिळतात. हे निर्माता, प्लॅटफॉर्म आणि स्क्रीन वेळेनुसार भिन्न असू शकते.

    सध्या शाहिद कपूर, माधुरी दीक्षित, जूही चावला, आयशा जुल्का, सोनाक्षी सिन्हा आणि रवीना टंडन यांची वेब सीरिजही येणार आहे. याशिवाय अनिल कपूरने ही वेबसुरीजमध्ये सहभाग घेतला आहे. प्रियंका चोप्राचा ‘क्वांटिको’ देखील लोकप्रिय आहे.