ओटीटी प्लॅटफॉर्म मंदावले, जाणून घ्या नक्की कारण काय?

कोरोनानंतर ओटीटी वाढीचा दर कमी झाला आहे. कोरोनामध्ये ओटीटीमध्ये मोठी वाढ झाली होती पण ती आता ओसरली आहे. डेटाची किंमत आणि डिजिटल माध्यमांची वाढ यासारख्या घटकांमुळे ही वाढ कमी झाली आहे.

    ओटीटी प्लॅटफॉर्म : कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे लोकांच्या जीवनामध्ये अनेक बदल झाले आहेत. कोरोना काळामध्ये द्योगधंदे बंद पडल्याने लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या रोजच्या जीवनांत धावपळ करणारे लोक घरामध्ये बसून होते. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमध्ये मनोरंजन क्षेत्रातील ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मला सर्वाधिक फायदा झाला. कोरोनाच्या काळामध्ये देशामधील चित्रपटगृहे एका वर्षाहून अधिक काळ बंद होती. अशा परिस्थितीत ओटीटी हे लोकांसाठी मनोरंजनाचे सर्वात मोठे साधन म्हणून उदयास आले. आज, अनेक नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी जोरदारपणे प्रयत्न करत आहेत.

    कोरोनाच्या काळामधे मोठ्या बजेटचे चित्रपट सुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळत होते. कारण कोरोनानंतर चित्रपटगृहांमध्ये जाणारे प्रेक्षक कमी झाला आहे. कोरोनामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मला त्यांची व्याप्ती वाढवण्याची चांगली संधी मिळाली. या काळात सगळे ओटीटी प्लॅटफॉर्मकडे सगळे वळले होते. याचा चित्रपटगृहांवर निश्चितच परिणाम झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मचे एकूण प्रेक्षक 13.5% वाढून 2023 मध्ये 481.1 दशलक्ष पर्यंत पोहोचले आहेत. 2022 मध्ये त्यांची संख्या 423.8 दशलक्ष होती असे मीडिया सल्लागार फर्म Ormax चे मत आहे. स्ट्रीमिंग अँप आता भारताच्या 1.4 अब्ज लोकसंख्येच्या 34% पर्यंत पोहोचले आहेत. असे वृत्त Livemint ने दिले आहे.

    कोरोनानंतर ओटीटी वाढीचा दर कमी झाला आहे. कोरोनामध्ये ओटीटीमध्ये मोठी वाढ झाली होती पण ती आता ओसरली आहे. डेटाची किंमत आणि डिजिटल माध्यमांची वाढ यासारख्या घटकांमुळे ही वाढ कमी झाली आहे. असे Ormax Media चे शैलेश कपूर यांचे मत आहे. विशेषत: ग्रामीण भागात आणि लहान शहरांमधील वाढीचा दर कमी आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर आता टॉप 20 शहरांच्या पलीकडे वाढू शकतो का हे मोठे आव्हान आहे, असे शैलेश कपूर म्हणाले. जगात सुमारे 27%, किंवा 129.9 दशलक्ष लोक फक्त YouTube आणि/किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहतात. 2023 हे वर्ष आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) आणि आता विश्वचषक यासह क्रीडा कंटेट विनामूल्य उपलब्ध करुन दिला जात आहे. याचा परिणाम ओटीटीच्या वाढीवर होत आहे.