तब्बल १०० लोकेशन्सवर चित्रीत आमिर खान आणि करिना कपूरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचं शुटींग पूर्ण, ख्रिसमसला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘लाल सिंह चड्ढा’ हा कॉमेडी-ड्रामा(Comedy Drama) घोषणेपासूनच अनेक कारणांमुळं चर्चेत राहिला आहे. हा चित्रपट सहा अकॅडमी पुरस्कार विजेता राहिलेल्या ‘फॉरेस्ट गंप’(Forest Gump)चा रिमेक आहे.

    अकॅडमी पुरस्कार विजेता ‘फॉरेस्ट गंप’चे अधिकृत हिंदी रिमेक(Hindi Remake Of Forest Gump) असलेला चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha)या वर्षी नाताळात प्रदर्शित होत आहे. मागील काही वर्षांमध्ये, आमिर खान प्रोडक्शन्सनं(Aamir Khan Productions) भारतीय प्रेक्षकांना बरेच दर्जेदार चित्रपट दिले आहेत, ज्यामध्ये ‘लगान’, ‘तारे जमीन पर’ आणि ‘दंगल’सारख्या चित्रपटांनंतर आता बहुप्रतीक्षित ‘लाल सिंह चड्ढा’ सामील होत आहे.

    ‘लाल सिंह चड्ढा’ हा कॉमेडी-ड्रामा(Comedy Drama) घोषणेपासूनच अनेक कारणांमुळं चर्चेत राहिला आहे. हा चित्रपट सहा अकॅडमी पुरस्कार विजेता राहिलेल्या ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक आहे. यात आमिर साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं सर्वांनाच कुतूहल आहे. आमिरनं आपल्या अनोख्या शैलीत आपलं कॅरेक्टर कसं साकारलंय याची उत्सुकता सर्वांनाच आहे. यात आमिरच्या जोडीला करीना कपूर खान आहे. ‘लाल सिंह चड्ढा’चं चित्रीकरण मागील वर्षी सुरु करण्यात आलं होतं. हा चित्रपट देशभरातील विविध १०० लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आला आहे. या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच मुंबईमध्ये पूर्ण झालं. त्या निमित्तानं संपूर्ण कास्ट आणि क्रूनं सेटवर एकत्र येऊन आनंद साजरा केला.

    आमिर खान प्रोडक्शन्स, वायकॉम १८ स्टूडियो आणि पॅरामाउंट पिक्चर्स यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाची पटकथा एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिली असून अद्वैत चंदन यांनी दिग्दर्शन केलं आहे.