शाहरुखच्या रईस चित्रपटातील सुंदर अभिनेत्रीनं उरकलं दुसरं लग्न, प्रसिद्ध उद्योजकासोबत बांधली लग्नगाठ

माहिरा खानने 2007 मध्ये अली अस्करीसोबत लग्न केले होते. माहिराचे अलीसोबतचे नाते फार काळ टिकले नाही आणि 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता तिने तिच्या प्रियकरासोबत दुसरे लग्न केले आहे.

  पाकिस्तानातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक माहिरा खान (Mahira Khan) नेहमीच चर्चेत असते. लॉलीवूडपासून बॉलिवूडमध्ये काम केलेल्या माहिराची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. त्याचवेळी आता माहिराबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. माहिरा खानने रविवारी तिचा प्रियकर सलीम करीमसोबत लग्न (Mahira Khan Wedding)केले, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या पाकिस्तानी वेडिंग ड्रेसमध्ये माहिराचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.

  बॉयफ्रेंडसोबत केलं  दुसरं लग्न

  38 वर्षीय माहिरा खानने तिचा दीर्घकाळचा प्रियकर सलीम करीमसोबत लग्न केले आहे. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाच्या बातम्याही बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. अखेर माहिराने तिचा लाईफ पार्टनर निवडून तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. लग्नाआधी माहिराने बिझनेसमनला पाच वर्षे डेट केले.

  वधूच्या पेहरावात अतिशय सुंदर दिसतेय माहिरा

  माहिरा खानच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती लग्नाच्या ड्रेसमध्ये किती सुंदर दिसत आहे हे तुम्ही पाहू शकता. लूकबद्दल सांगायचे तर, माहिराने तिच्या लग्नाच्या दिवशी फिकट निळ्या रंगाचा लेहेंगा निवडला. यासोबत अभिनेत्रीने मॅचिंग ओढणी घेतील आहे, ज्यामुळे तिचा लूक आणखीनच सुंदर दिसत आहे. वराच्या लुकबद्दल सांगायचे तर, सलीम करीमने सर्व काळ्या रंगाची शेरवानी घातली होती ज्यावर त्याने निळ्या रंगाचा स्कार्फ बांधला होता.

  एकमेकांना पाहून डोळ्यात तरळले अश्रू

  समोर आलेल्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माहिराला वधूच्या पोशाखात पाहून सलीमला अश्रू अनावर झाले आहेत. तो स्वतःला रडण्यापासून रोखू शकत नाही. यानंतर जेव्हा माहिरा त्याच्याकडे येते तेव्हा सलीम तिचा बुरखा काढून तिच्या कपाळावर आणि गालावर चुंबन घेतो. हे पाहून तिथे उपस्थित सर्वजण टाळ्या वाजवू लागले.

  कोण आहे माहिराचा नवरा सलीम?

  रईस या बॉलीवूड चित्रपटातून सुपरस्टार शाहरुख खानसोबत दमदार पदार्पण करणाऱ्या माहिराचा पती सलीम करीम हा पाकिस्तानी स्टार्टअप सिंपैसाचा सीईओ आहे. तो एक उद्योजक असण्यासोबतच, डीजे देखील आहे. सोशल मीडियावरही तो खूप सक्रिय असतो.