Panchayat season 3 Release Date | अखेर प्रतिक्षा संपली! 'पंचायत 3' ची रिलीज डेट अखेर जाहीर; 'या' दिवशी होणार मनोरंजनाचा धमाका! | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
Published: May 03, 2024 09:55 AM

Panchayat season 3 Release Date अखेर प्रतिक्षा संपली! ‘पंचायत 3’ ची रिलीज डेट अखेर जाहीर; ‘या’ दिवशी होणार मनोरंजनाचा धमाका!

अखेर प्रतिक्षा संपली! ‘पंचायत 3’ ची रिलीज डेट अखेर जाहीर; ‘या’ दिवशी होणार मनोरंजनाचा धमाका!

मागील काही दिवसांपासून प्राईम व्हिडीओकडून 'पंचायत 3'च्या रिलीज डेटबाबत हिंट दिली जात होती. अखेर या वेबसिरीजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

  अनेक दिवसापासून वेबसिरिज पंचायच्या तिसऱ्या सिझन बद्दल चर्चा सुरू आहे. चाहत्यांकडून सातत्यानं या वेबसिरिजच्या रिलीज डेटबद्दल प्रश्न विचारण्यात येत होता. काही दिवसापुर्वी अॅमेझान प्राईमनं एका कार्यक्रमात याबाबत घोषणा केली होती तेव्हापासून प्रेक्षक आतुरतेने या वेबसिरीजच्या रिलीज होण्याची आतुरतनेने वाट पाहत आहे. तर अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून प्राईम व्हिडीओकडून वेबसिरिजची रिलीज डेटची (Panchayat season 3 Release Date )घोषणा करण्यात आली आहे. ही वेब सीरिज 28 मे 2024 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  गेल्या अनेक दिवसापासून पंचायत वेबसिरिजच्या तिसऱ्या सिझनबाबत प्राईम व्हिडीओ प्रेक्षकांना हिंट देत होते. अखेर त्यांनी प्रेक्षकांची प्रतिक्षा करणं थांबवल असून त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ‘पंचायत 3’ची रिलीज डेट जाहीर केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by prime video IN (@primevideoin)

  तिसऱ्या सिझनमध्ये ट्विस्ट?

  रिपोर्टनुसार,’पंचायत 2’ वेब सीरिजच्या शेवटच्या एपिसोडमध्ये आमदार गावात झालेल्या अपमानानंतर सचिवाची बदली करण्याचा विचार करत असल्याचे दाखवण्यात आलं आहे. आता, तिथूनच कथानक पुढे जाणार असल्याचा अंदाज आहे. गावात आता गणेश ही व्यक्ती आता नवीन सचिव असणार आहे. ‘पंचायत’च्या पहिल्या सीझनमध्ये  “गजब बेइज्जती है”  हा संवाद प्रसिद्ध झाला होता. यावर मीम्सचा पाऊस पडला होता. आसिफ खानने गणेश ही व्यक्तीरेखा साकारली होती.  “गजब बेइज्जती है” हा संवाद आसिफच्या तोंडी नव्हता. तरीही तो प्रसिद्ध झाला. गणेश हा फुलेरा गावाचा जावई असतो. लग्नाच्यावेळी झालेला कथित अपमान, मुलीकडील लोकांनी गैरसोय करणे अशा वेगवेगळ्या कारणांनी वऱ्हाड नाराज असते. आता, हाच जावई फुलेरा गावचा ‘सचिवजी’असणार आहे.

  Comments
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.