kushal badrike and bhau kadam in pandu

‘पांडू’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॉन्च(Pandu Movie Trailer Launch) झाला आहे.या चित्रपटात भाऊ कदम (Bhau Kadam) पांडू ही भूमिका साकारत आहे. तसेच कुशल बद्रिके (Kushal Badrike) ‘महादू’च्या भूमिकेत दिसणार आहे.

  ‘पांडू’ (Pandu)या मराठी चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. ‘पांडू’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॉन्च(Pandu Movie Trailer Launch) झाला आहे.या चित्रपटात भाऊ कदम (Bhau Kadam) पांडू ही भूमिका साकारत आहे. तसेच कुशल बद्रिके (Kushal Badrike) ‘महादू’च्या भूमिकेत दिसणार आहे. भाऊ आणि कुशल ही महाराष्ट्राची लाडकी जोडी मोठा पडदा गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

  या भूमिकेबद्दल बोलतांना भाऊ म्हणाले की, “सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत प्रेक्षकांना मनोरंजनाच्या दोन घटका देणं आणि त्यांचा ताण हलका करणं यासारखं पुण्याचं काम दुसरं काहीच नाही. ‘पांडू’ प्रेक्षकांची ही गरज शंभर टक्के पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. दिग्दर्शक विजू मानेंसोबत काम करण्याचा अनुभव कायमच मजेशीर राहिलेला आहे आणि सोबतीला कुशल असल्यामुळे ही केमिस्ट्री अजूनच चांगली खुलून आली आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी फार मोठी आणि महत्वाची बाब आहे”

  कुशल या चित्रपटाबद्दल म्हणतो की,“मी या चित्रपटात महादू हवालदाराची भूमिका साकारतोय. मी आणि भाऊ, आम्ही आजवर विविध माध्यमांतून लोकांचं मनोरंजन केलंय. हीच परंपरा हा चित्रपटसुद्धा कायम ठेवेल यात शंकाच नाही.”