पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका; मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव करणार दिग्दर्शन

    मुंबई : 25 डिसेंबर रोजी भारतचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेय यांच्या जन्मतिथीचे निमित्त साधून ‘मैं हूं अटल’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. यात अटलजी यांची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर लाँच करून लवकरच हा चित्रपट लोकांच्या भेटीला येईल असे सांगितले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव यांनी केले आहे.

    अभिनेते पंकज त्रिपाठी यांना अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत पासून चाहत्यांनी पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडला आहे. पंकज त्रिपाठीने चित्रपटाची घोषणा करताना, “न कभी कहीं डगमगाया, न कभी कहीं सर झुकाया, मैं एक अनोखा बल हूँ, मैं अटल हूँ” असे म्हंटले. तसेच तो म्हणाला हे अद्वितीय व्यक्तिमत्व पडद्यावर व्यक्त करण्याची संधी मिळाली. मी भावनिक आहे मी आभारी आहे.

    “मैं अटल हूँ” या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांचा पहिला चित्रपट ‘नटरंग’ जो 2010 मध्ये आला तर त्यात अतुल कुलकर्णी यांनी येथे उच्च श्रेणीचे काम केले. रवीच्या पहिल्या चित्रपटालाही राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांचा पुढचा चित्रपट ‘बालगंधर्व’ होता. या चित्रपटाला पुरुष पार्श्वगायन, मेक-अप आणि कॉस्च्युम डिझाइन या श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. काही वेळातच रवी मराठी चित्रपटसृष्टीचा प्रभावशाली दिग्दर्शक बनला. “मैं अटल हूँ” हा चित्रपट पुढील वर्षी डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.