जेष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

जेष्ठ गायक पंकज उधास यांनी वयाच्या 72 व्या जगाचा निरोप घेतला, अनेक दिवसापासून ते आजारी होते.

  मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. जेष्ठ गायक गायक पंकज उधास यांचं निधन  (Pankaj Udhas Passes Away) झालं आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी नायाब उधास हिने त्यांच्या निधनाची बातमी सोशल मिडीयावर शेअर केली आहे. त्याच्या जाण्याने  संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत.

  नायाब उधासने पोस्टमध्ये लिहिलं की – अत्यंत दु:खाने आपल्याला सांगावे लागत आहे की, पद्मश्री पंकज उधास यांचं २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झालं. ते बरेच दिवसापासून आजारी होते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Nayaab Udhas (@nayaabudhas)