parineeti and raghav

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्न सोहळा उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये होणार आहे. नुकतेच परिणीती आणि राघव चढ्ढा यांचे उदयपूर येथील विमानतळावरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) शुक्रवारी(22 सप्टेंबर) सकाळी उदयपूरला (Udaipur) पोहोचले आहेत. राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्न सोहळा उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये होणार आहे. नुकतेच परिणीती आणि राघव चढ्ढा यांचे उदयपूर येथील विमानतळावरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  काळा टीशर्ट, निळी जिन्स आणि डोळ्यावर गॉगल अशा लूकमध्ये राघव चढ्ढा हे उदयपूरच्या विमानतळावर आलेले दिसले. त्यानंतर परिणीती ही रेड आऊटफिट, मोकळे केस, डोळ्यावर गॉगल अशा कॅज्युअल लूकमध्ये उदयपूरच्या विमानतळावर आलेली दिसली. विमानतळावर दोघांचे स्वागत ढोल वाजवून करण्यात आले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या मित्र आणि कुटुंबासाठी दिल्लीत एका सुफी नाइटचे देखील आयोजन केले होते. परिणीती आणि राघवच्या लग्नाचे कार्यक्रम 23-24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये होणार आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

  राजस्थानमध्ये शाही पद्धतीनं होणार लग्न
  काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव यांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. परिणीती आणि राघव यांचे लग्न राजस्थानमध्ये शाही पद्धतीनं होणार आहे. उदयपूरच्या ‘द लीला पॅलेस’ हॉटेलमध्ये 24 सप्टेंबर रोजी दोघेही लग्न करणार आहेत. चंदीगड येथील ताज हॉटेलमध्ये 30 सप्टेंबर रोजी परिणीती आणि राघव यांची रिसेप्शन पार्टी होणार आहे.

  राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा दिल्लीमध्ये 13 मे 2023 रोजी पार पडला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांच्या साखरपुड्याला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हजेरी लावली. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.