तेलुगू टीव्ही इंडस्ट्रीची आघाडीची अभिनेत्री पवित्रा जयरामचं निधन, अपघातात बहिणीसह दोघं गंभीर जखमी

तेलुगू टीव्ही इंडस्ट्रीची अभिनेत्री पवित्रा जयराम  यांचे रविवारी (१२ मे) निधन झाले. अभिनेत्रीची कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकली, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. हा अपघात इतका भीषण होता की त्याचा जागीच मृत्यू झाला.

  तेलुगू टिव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेलुगू मालिका विश्वातील आघाडाची अभिनेत्री पवित्रा जयराम (Pavithra Jayaram) हिचा रविवारी रस्ता अपघातात मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील मेहबूबा नगरजवळ झालेल्या भीषण कार अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिच्या बहिणीसह आणखी दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती
  आहे. या घटनेनं तेलगू सिनेविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

  दुभाजकाला धडकली कार

  मिळालेल्या माहितीनुसार,  कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील हनाकेरे येथून परतत असताना हा अपघात झाला. पावित्रा असलेल्या या कारचे नियंत्रण सुटलं आणि दुभाजकावर आदळल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर हैदराबादहून वानापर्थीकडे येणाऱ्या बसने उजव्या बाजूने कारला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात अभिनेत्री गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

  अन्य तिघं गंभीर जखमी

  मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपघातात अभिनेत्रीची चुलत बहीण अपेक्षा, ड्रायव्हर श्रीकांत आणि अभिनेता चंद्रकांत गंभीर जखमी झाले आहेत. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

  तेलगू टीव्ही इंडस्ट्रीवर पसरली शोककळा

  अभिनेत्री पावित्राच्या निधनाची बातमी कळताच तेलुगू मनोरंजन उद्योगावर शोककळा पसरली होती. अभिनेते समीप आचार्य यांनी अभिनेत्रीच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर त्याने लिहिले, “तू नाहीस या बातमीने जाग आली. विश्वास बसत नाही. माझी पहिली ऑन-स्क्रीन आई, तू नेहमीच खास राहशील.