Pawankhind

दिग्पाल लांजेकर(Digpal Lanjekar) लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ (Pavankhind Release Date)या चित्रपटाची मोठी उत्सुकता चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांना होती. ३१ डिसेंबरला स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची ही विजयगाथा ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या रुपानं पाहायला मिळणार आहे.

    पावनखिंडीचा(Pawankhind Battle) रणसंग्राम घडून आज ३६१ वर्षांचा काळ उलटला असला तरी हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवत आहे. झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या(Bajiprabhu Deshpande) पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर(Djgpal Lanjekar) लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ (Pawankhind Release Date)या चित्रपटाची मोठी उत्सुकता चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांना होती. ३१ डिसेंबरला स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची ही विजयगाथा ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या रुपानं पाहायला मिळणार आहे.

    पावनखिंडीचा थरार दर्शविणारं चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं ‘पावनखिंड’ नाव पडलं. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात मांडली आहे. शिवराज अष्टकातील ‘पावनखिंड’ हे तिसरं पुष्प आहे. यात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आाणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पाहायला मिळणार असून, मराठीतील आघाडीतील कलाकार आहेत.