cinema lovers day

‘सिनेमा लव्हर्स डे’ निमित्त सिनेप्रेमींना खास ऑफर देण्यात आली आहे. आता 20 जानेवारीला ‘सिनेमा लव्हर्स डे’ (Cinema Lovers Day) साजरा केला जाणार आहे. या दिवशी सिनेप्रेमींना फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे.

  प्रेक्षकांना चित्रपट (Movie) थिएटर्समध्ये जाऊन बघण्याची इच्छा तर असते. मात्र अनेक वेळा लोक तिकीटाची किंमत जास्त असल्याने चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत नाहीत. याचाच विचार करून ‘सिनेमा लव्हर्स डे’ निमित्त सिनेप्रेमींना खास ऑफर देण्यात आली आहे. आता 20 जानेवारीला ‘सिनेमा लव्हर्स डे’ (Cinema Lovers Day) साजरा केला जाणार आहे. या दिवशी सिनेप्रेमींना फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. काही मल्टीप्लेक्स चेन्सने 20 जानेवारीला ‘सिनेमा लव्हर्स डे’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पीव्हीआर सिनेमाज, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या मल्टीप्लेक्स चेन्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याविषयी माहिती दिली आहे.

  काय आहे ऑफर ?
  मिळालेल्या माहितीनुसार 99 रुपयांमध्ये सिनेमा पाहण्याची ऑफर रिक्लिनर्स, IMAX, 4DX या फॉरमॅटवर लागू होणार नाही. तसेच 99 रुपयांमध्ये जीएसटीच्या रकमेचा समावेश नाही. तसेच, ही ऑफर फक्त 20 जानेवारी या एकाच दिवशी उपलब्ध आहे. ही ऑफर निवडक शहरांमध्येच दिली जाईल असेही सांगण्यात आले आहे. तसेच तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमध्ये 100 रुपये प्लस जीएसटीसह तिकिटे मिळणार आहेत. तर, तेलंगणामध्ये 112 रुपये प्लस जीएसटी भरावा लागेल. ही ऑफर आपल्या शहरात आहे की नाही हे पाहण्यासाठी पीवीआर सिनेमाज, आयनॉक्स आणि सिनेपोलिस यांच्या वेबसाईटवर जाऊन चेक करावे लागेल.

  बुक माय शो वेबसाईटनुसार, जर तुम्ही दिल्लीत 20 जानेवारीचे तिकीट बुक केले तर प्राईम सीट श्रेणीतील तिकिटाची किंमत 121.42 रुपये आहे. यामध्ये 22.42 रुपये इतके सुविधा शुल्क आहे. या फीमध्ये 18% GST चा देखील समावेश आहे. तसेच मुंबई जीएसटीसह, एका तिकिटाची किंमत 110.68 रुपये होत आहे.

  सध्याचे चित्रपट
  अवतार 2, कुत्ते, दृश्यम 2, वेड, वारिसु हिंदी, वाल्टेयर वीरय्या हिंदी, द कश्मीर फाइल्स, भेडिया, ऊंचाई, वाळवी हे चित्रपट तुम्ही 99 रुपयांच्या ऑफरमध्ये पाहू शकता.