chhagan bhujbal and mahesh manjrekar

‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 3) शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar Lookin Like Chhagan Bhujbal)यांच्या लूकमुळे त्यांची तुलना ही नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी केली आहे.

    ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 3) या शोचे तिसरे पर्व सुरु आहे. या शोमध्ये सुत्रसंचालन करणारे अभिनेते महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) सध्या चर्चेत आले आहेत. शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar Lookin Like Chhagan Bhujbal)यांच्या लूकमुळे त्यांची तुलना ही नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी केली आहे.

    सध्या व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर मीरा जगन्नाथला सुनावत असल्याचे दिसत आहे. पहिल्या दिवसापासूनच मीराने घरात भांडण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मीरा अनेक ठिकाणी चुकल्याचं महेश मांजरेकर म्हणाले. यावेळी स्पष्टीकरण देण्यासाठी मीराने प्रयत्न केला मात्र संतापलेल्या महेश मांजरेकरांनी तिला “तू आधी ऐकायला शिक”असा सल्ला दिला.

    cooment about mahesh manjrekar

    सध्याचा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी महेश यांची तुलना छगन भुजबळ यांच्याशी केली आहे. एक नेटकरी म्हणाला, “मला वाटलं भुजबळ च आहे की काय.” दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मला वाटलं छगन भुजबळ इकडे कसे काय.” तिसरा नेटकरी म्हणाला, “Same to same छगन भुजबळ साहेब.”

    सध्या सोशल मीडियावर महेश मांजरेकरांचीच चर्चा सुरु आहे.