
प्रदीप लायकर(Pradeeo Laykar) यांनी ‘पिरेम’ (Pirem)या आगामी चित्रपटात प्रेमाचे आजवर कधीही सादर न झालेले पैलू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या ‘पिरेम’च्या टीझरमध्ये(Pirem Teaser Video) ती म्हणते, ‘तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय रे...’ तो म्हणतो, ‘माझं संपूर्ण आयुष्य. माझा प्रत्येक श्वास न श्वास फक्त तुझ्यासाठी आहे...’ अशा प्रकारचे गुलाबी संवाद ‘पिरेम’च्या टीझरमध्ये आहेत.
सिनेमागृहांची कवाडं उघडल्यानं आता खऱ्या अर्थानं रसिकांचं मनोरंजन सुरू झालं आहे. भावी काळात प्रेक्षकांना विविध विषयांवरील चित्रपट पाहायला मिळणार आहेत. यात गुलाबी प्रेमावर आधारित असलेल्या पर्व फिल्म्सचा ‘पिरेम’(Pirem) हा चित्रपटही रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झाला आहे. आजवर बऱ्याच दिग्दर्शकांनी आपापल्या परीनं रुपेरी पडद्यावर प्रेमभावना सादर केल्या असल्या तरी या विषयातील नवीन्य आणि ओढ जराही कमी झालेली नाही.
प्रदीप लायकर यांनी ‘पिरेम’ (Pirem)या आगामी चित्रपटात प्रेमाचे आजवर कधीही सादर न झालेले पैलू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या ‘पिरेम’च्या टीझरमध्ये(Pirem Teaser Video) ती म्हणते, ‘तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय रे…’ तो म्हणतो, ‘माझं संपूर्ण आयुष्य. माझा प्रत्येक श्वास न श्वास फक्त तुझ्यासाठी आहे…’ अशा प्रकारचे गुलाबी संवाद ‘पिरेम’च्या टीझरमध्ये आहेत.
आपल्या मनातील प्रेमाची व्याख्या नायिकेला सांगणारा नायक आणि त्याच्या मनातील गुलाबी भावना या टीझरद्वारे व्यक्त करण्यात आल्या आहेत. या टीझरला ‘मन झालं हलकं फुलकं…’ या गाण्याची सुरेल जोडही देण्यात आली आहे. त्यामुळं प्रेमळ संवाद आणि गुलाबी गाण्याचा संगम ‘पिरेम’च्या टीझरमध्ये पहायला मिळतो. ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती विश्वजीत विठ्ठल पाटील यांनी केली असून, रोहन-रोहन या संगीतकार जोडीनं संगीत दिलं आहे.