vishwajeet and divya in pirem

‘पिरेम’(Pirem Movie) या चित्रपटातून विश्वजीत पाटील(Vishwajeet Patil) आणि दिव्या सुभाष(Divya Subhash) ही एक नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या जोडीची केमिस्ट्री रसिकांना आकर्षित करणारी ठरणार आहे. त्यांच्यासोबत मानिनी दुर्गे, विठ्ठल खलसे, सागर खुर्द आदी कलाकारही आहेत.

    पर्व फिल्म्स निर्मित ‘पिरेम’ (Pirem)हा आगामी मराठी चित्रपट ३ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘पिरेम’ या टायटलवरून कल्पना आलीच असेल की, याची कथा ग्रामीण भागातील(Rural Area Love Story) आहे. ही कहाणी एका गावातील गरीब घरातील अत्यंत हुशार मुलाची आहे, जो गावात उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळं दहावीनंतर शहरातील कॉलेजात शिकायला जातो. तिथं त्याच्या आयुष्यात प्रेमांकुर फुलतो; परंतु तो एका विचित्र प्रसंगात गुरफटून जातो.

    ‘पिरेम’(Pirem Movie) या चित्रपटातून विश्वजीत पाटील(Vishwajeet Patil) आणि दिव्या सुभाष(Divya Subhash) ही एक नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या जोडीची केमिस्ट्री रसिकांना आकर्षित करणारी ठरणार आहे. त्यांच्यासोबत मानिनी दुर्गे, विठ्ठल खलसे, सागर खुर्द आदी कलाकारही आहेत.

    जगात कुठेही प्रेम ही भावना सारखीच असते. जात, भाषा, वर्ण, धर्म, गरीब, श्रीमंत, शहर वा गाव अशा कुठल्याही गोष्टी प्रेमामध्ये अडसर ठरत नाहीत. खऱ्या प्रेमामध्ये स्वार्थाला तसूभरही जागा नसते व दोन्ही व्यक्ती समोरच्याला अधिकाधिक आनंद मिळावा, यासाठी प्रयत्नशील असतात. प्रदीप लायकर दिग्दर्शित ‘पिरेम’या मराठी चित्रपटात हिच भावना अतिशय वेगळ्या ढंगानं सादर केली आहे.